Posts

Showing posts from January, 2020

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन : भावपूर्ण श्रद्धांजली

Image
स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . महिल्यांच् या चळवळीला विशेष योगदान देणाऱ्या विद्या बाळ या लेखिका आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. पुढे १९६४ ते १९८३ या दरम्यान त्यांनी स्त्री या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणूनही काम पाहिले. विद्या बाळ यांनी १९८९ मध्ये मिळून साऱ्याजणी हे मासिक सुरू केले. हे मासिक अल्पावधीत लोकप्रिय ठरले. या मासिकाद्वारे स्त्रियांचे विश्व उलगडत त्यांनी महिल्याच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत समाज प्रबोधन केले. स्त्रियांच्या समस्या सोडवता याव्यात यासाठी विद्या बाळ यांनी ’नारी समता मंच’ ही संघटना स्थ...

मूकनायक’ म्हणजे आंबेडकरी पत्रकारितेची सुरुवात

Image
नैमितिक लेख मूकनायक शताब्दी दिन (दि. 31 जानेवारी 2020 ) छपाईच्या तंत्रज्ञानाच्या शोधाने जगभर प्रबोधनाच्या युगाचा प्रारंभ झाला. हा शोध क्रांतीकारक ठरला. इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात मुद्रण कलेचा उगम चीन मध्ये झाल्याचं ग्रहीत धरलं तरी खऱ्या अर्थानं विकसित मुद्रण केलेचा विकास होण्यास इ.स. 1450 हे वर्षे उजाडावे लागलं. त्याचं श्रेय गूटेनबेर्क यांच्याकडे जातं. भारतामध्ये मुद्रण तंत्र प्रथम इ.स. 1556 मध्ये माहीत झालं.यावर्षी गोव्यात पोर्तुगीज लोकांनी एक मुद्रणालय सुरु केलं. परंतु त्यावर छापलेल्या पहिल्या पुस्तकाची भाषा आणि लिपी मात्र परकीय होती. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक छापखाना उभारला होता परंतु त्यांना तो सुरु करणं शक्य झालं नाही, त्यांनी तो 1674 मध्ये गुजरातमधील भीमजी पारेख या व्यापाऱ्यास विकली. तथापि, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मुद्रणची सुरुवात 1812 मध्ये झाली. त्यावर्षी अमेरिकन मिशनने मुंबईत मुद्रणालय सुरु केले. त्यांनी रामपूर येथून देवनागरी लिपीचे काही खिळेही त्यासाठी आणले होते. त्यावर 1817 मध्ये छापलेले एक पुस्तक उपलब्ध आहे. मुद्रण तंत्राची सुरुवात झाल्...

सतीश जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!!!

Image
सतीश जाधव म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील बुद्धिमान आणि हुशार अधिकारी ... मी महासंचालनालयात 1999 मध्ये मंत्रालयात रुजू झालो तेव्हा ते माझे वरिष्ठ सहकारी होते ...वृत्त शाखेत आम्ही काम करीत असू ... माझ्या सोबत सदाशिव कांबळे , अनिरुद्ध अष्टपुत्रे हेही होते ... वृत्त शाखेतील बातम्यांचे संपादन करून वेळेत रायडर मार्फत वृत्तपत्र आणि इतर माध्यमांना फोटो आणि बातम्या पाठवाव्या लागत ...तसेच दूरदर्शन ला मंत्रालयात ील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या बैठका , कार्यक्रम तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यातून पोष्टाने येणाच्या कसेट पाठवावयाच्या असत या कामी सतीश जाधव आम्हास मदत तर करत असतच परंतु मराठी भाषा नेमकेपणान वापरण्यावर त्यांचा भर असे ...कोणतीही क्लिष्ट गोष्ट सोपी करण्यातही त्यांची मदत होत असे ... पुणे विद्यापीठातून अर्थात आताच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून वाणिज्य आणि पत्रकारितेची पदवी घेतलेल्या जाधव यांचं वाचनही खास होतं ...वौचरिक विषयांवर त्यामुळं छान गप्पा जमत ...मित भाषी सतीश जाधव कधीही त्यांच्या जीवनातील दुःखाचा कोपरा उघड करत नसतं ... त्यांच्या खास हास...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लाला लजपत राय यांच्यावरील अग्रलेख ...!!!

Image
लाला लजपत राय यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ... !!! ***** लाला लजपत राय यांचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लाहोर , पंजाब ( ब्रिटिश भारत ) येथे निधन झालं ... डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी पाक्षिक " बहिष्कृत भारत " मध्ये त्यांच्यावर मृत्यू लेख लिहिला ... बाबासाहेबांच्या वृत्तपत्रीय एकूण लेखनात त्यांनी मोजकेच मृत्यू लेख लिहिले आहेत ... परंतु त्यांचा दर्जा उच्च कोटींचा आहे ... लाला लजपत राय यांच्या राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना आपुलकी होती ... ती या मृत्यू लेखात व्यक्त झाली आहे ... लाला लजपत राय यांची ही १५५ वी जयंती आहे ... माझ्या अभिवादाना सोबत मुद्दाम देत आहे ...बाबासाहेब यांच्या अनुयायांना हा लेख नक्की आवडेल ... ***** प्रासंगिक विचार देशभक्त लाला लजपतराय यांस गेल्या महिन्याच्या १७ तारखेस एकाकी काकी हृदयक्रिया बंद पडून मृत्यु आला , ही गोष्ट नमूद करण्यास आम्हास अत्यंत दुःख होत आहे . सायमन कमिशन लाहोरला गेले असता त्याला परत जा म्हणन सांगण्याकरिता जी बहिष्कारवादी लोकांची चमू स्टेशनवर उपस्थित झाली होती तिच्या अग्रभागी लालाजी होते . गर्दी मागे ...

माईसाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...!!!

Image
डॉ. सविता या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना माई किंवा माईसाहेब नावाने संबोधतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधान लिखाणाच्या काळात, हिंदू कोड बिल आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या .माई तथा माईसाहेब शारदा भीमराव आंबेडकर यांचा जन्म जानेवारी २७, १९०९ पुण्यात झाला .माई आंबेडकर यांचे २९ मे २००३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतीळ जे जे रुग्णालयात निधन झाले . त्यांच्या वडीलाचे नावकृष्णराव कबीर असे होते .आईचे नाव जानकी असे होते . त्यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते. त्यांचे घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दोरला गावचे होते. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली आणि तीन मुलगे होती. या एकूण आठ मुलांपैकी सहा भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला, इतके ते त्या काळातही पुरोगामी विचाराचे होते. याबद्दल माईसाहेबांना मोठा अभिमान वाटे. शारदा ह्या विद्यार्थिदशेत अत्यंत हुशार होत्या. त...

Warning of Dr . Babasaheb Ambedkar

Image
Today is your Republic Day , I like to quote tow statements of Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar , one is " It is n ot that India did not know what is Democracy . There was a time when India was studded with republics, and even where there were monarchies , they were either elected or limited . They were never absolute . It is not that India did not know parliaments or parliamentary procedure . A study of the Buddhist Bhikshu Sanghas discloses that not only there were Parliaments __ but the sanghas knew and observed all the rules of Parliamentary Procedure known to modern times . They had rules regarding seating arrangements , Motions, Revolutions, Quorum, Whip , Regularization, Res Judicata , etc . Although these rules of Parliamentary Procedure were applied by Buddha to the meetings of the Sanghas , he must have borrowed them from the rules of the political assemblies functioning in the country in his time ." And the second quote of Dr . Babasaheb Ambedkar . He wa...

माझ्या संग्रहातील संविधान .... इतर ग्रंथ ...!!!

Image
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!! माझ्या वैयक्तिक संग्रहात संविधानाच्या सहा प्रती आहेत ...त्यातील भारत सरकार पाठय पुस्तक मुद्रणालयानं मुद्रित केलेली आणि नियंत्रक , भारत सरकार , सिव्हिल लाईन्स , नवी दिल्ली यांच्यातर्फे 1996 मध्ये प्रकाशित केलेली ...तसेच महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाद्वारे अनुवादित आणि संचालक , शासन मुद्रण व लेखन सामग्री , महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे भारत सरकारच्या वतीने मुद्रित व प्रकाशित 20 14 ची प्रत माझ्या संग्रही आहे ... 1996 ची संविधानाची प्रत मी 1997 मध्ये संसद भवन , नवी दिल्ली येथून विकत घेतली होती ... संविधानासंबंधीत 20 पेक्षा जास्त ग्रंथ मराठी ,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील माझ्या संग्रही आहेत ... संविधानासंबंधीत काही ग्रंथ प्रामुख्यानं इंग्रजी भाषेततील मुलाकडे आहेत ...तर काही ग्रंथ आज सापडली नाहीत ... संविधान परिषदेनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारलं ... आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आणण्याचा निर्णय ही घेतला ... 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ...म्हणजेच या दिवसापासून देशात प्रजेचं राज्य सुरू...

विचारवंत मे. पु .रेगे

Image
महाराष्टातील मोजक्या विचरवंतांपैकी एक असलेल्या मे . पुं . रेगे तथा मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला ... तर २८ डिसेंबर २००० रोजी त्यांचं निधन झालं ... ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते ... ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते ... मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले ... त्यांनी मराठी भाषिकांना पाश्चात्त्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला ... ' पाश्चात ्त्य नीतिशास्त्राचा इतिहास ' , ' तत्त्वज्ञानातील समस्या ' ही भाषांतरे , ' नवभारत ' ( मासिक ) मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्त्य तत्त्वज्ञानविषयक आणि तत्त्ववेत्त्यांच्या नोंदी पाहता , रेगे यांच्या कार्याची , त्यांचे तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची खात्री पटेल ... भारतीय दर्शने , ग्रीक पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि इतर अनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती ... मे . पुं . रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते ... ते...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मराठी हस्त अक्षर

Image
आज  २३ जानेवारी 2020  हस्त अक्षर दिन ... भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मराठी हस्त अक्षर ... याच हस्त अक्षरांतून विचारांची पेरणी करत सामाजिक परिवर्तनाची स्फुलिंग पेटवण्याची क्रांती बाबासाहेब यांनी केली ...मराठी भाषेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्टातील मराठी भाषिकांशी लेखणी आणि वाणीने सवांद साधला ... पण ग्रंथ लेखन मात्र इंग्रजी भाषेत केलं ... असं म्हणतात बाबासाहेब इंग्रजीत विचार करत आणि लिहीत असतं ... मराठीत लिहितानाही प्रथम इंग्रजीत लिहून मग त्याचं अस्सल मराठीत भाषांतर करत ...पण त्याचं मराठी लेखन वाचताना चुकूनही हे भाषांतरित लेखन असावं असं वाटतं नाही ... हस्त अक्षरावरून माणसाचा स्वभाव , भाव - भावना कळतात असंही म्हणतात ... बाबासाहेबांचं हस्त अक्षर त्यांच्या विचारांचा आरसा आहे ...

स्मरण समाज सुधारक टक्कर बाप्पांचे ...!!!

Image
समाजसुधारक ठक्कर बाप्पा अर्थात अमृतलाल ठक्कर यांची आज पुण्यतिथी त्यांना विनम्र अभिवादन ... !!! दलित आदिवासीच्या जीवनात प्रकाश पडावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख व्हवी ... महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारणाच्या कामात सदैव त्यांच्या सोबत राहून काम केलेले महात्मा गांधीजीचे सहकारी होते ... गुजरातमधील सौराष्ट्रातील भावनगर येथे 29 नोव्हेंबर 1869 रोजी जन्म झाला तर 20 जानेवारी 1951 रोजी त्यांचा मृत्यू झाला ... अमृतलाल टक्कर हे त्यांच्या वडिलांचे नाव होतं ...आदिवासी कुटूंबात जन्म झालेल्या बाप्पा टक्कर यांच्या कुटूंबाची सांपत्तिक स्थिती उत्तम होती ... त्यामुळं त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे ...पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधून 1890 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी एल सी इ अर्थात LCE Licenciate in Civil Engineering हल्लीची बी इ ( B. E . )Graduate in Civil Engineering प्राप्त केली होती ... ठक्कर बाप्पांनी महाराष्ट्रातील तत्कालीन सांगली सवस्थानात मुख्य अभियंता म्हणून काम केलं होतं ...त्यानंतर त्यांनी तेंव्हाच्या बॉम्बे पालिकेतही अभियंता म्हणून काम केले ...

ग्रेटाची हाक

Image
ज्येष्ठ पत्रकार , लेखक आणि पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांच्या " ग्रेटाची हाक ... तुम्हाला ऐकू येतेय ना " या पुस्तकाचं अलीकडेच पुण्यात प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन झालं ... हे पुस्तक काल कार्यालयात भेटून त्यांनी भेट दिलं ... ग्रेटा पर्यावरण संरक्षणासाठी , जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी ,कार्बनउत्सर्जन कमी करून शून्यावर आणण्यासाठी शाळेत जाण्यास नकार देऊन जगाला याकामी आर्त हाक देतेय ...अशा बातम्या अलीकडे वाचतांना ग्रेटाचं " ग्रेटपण " दिसून येत होतं ...ति च्याबद्दल मिळेल तसं वाचत असताना मुंबई दौऱ्यात तिच्याबद्दलच्या पुस्तकाचा शोधही घेतला पण असं पुस्तक मिळालं नाही ...दरम्यान अतुल देऊळगावकर यांच्या पुस्तक प्रकाशनाची बातमी वाचली अन आनंद झाला ... ,अतुल देऊळगावकर यांचा या क्षेत्रातील अधिकार असल्यानं हे पुस्तक खूप छान झालंय ...प्रकाशकानं खूप मेहनत घेतलीय हे दिसून येतंय ...पुस्तक वाचून पुन्हा त्यावर व्यक्त हिणार आहेच ...तूर्तास धन्यवाद अतुलजी ...

कुंदनलाल सैगल

Image
 कुंदनलाल सैगल हे महान गायक आणि नट होते ... 18 जानेवारी 1947 रोजी त्यांचं निधन झालं ...त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!!! कुंदनलाल सैगल यांनी अवघ्या पंधरा - सोळा वर्षाच्या कालखंडात संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला ... त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो ... ' जब दिल ही टूट गया ' हे ' शाहजहाँ ' चित्रपटातील गीत ऐकताना ' हम जी के क्या करेंगे ' मधील ' क्या ' हा स्वर गाताना उदास , हतबल आणि सकारण असा उच्चार हे सारेच भिडल्यावाचून राहत नाही ... दोन्ही अंतांमध्ये ' इक भेदी लूट गया ' किंवा ' हर साथी छूट गया ' ही विफलता समजण्यासाठी मूळ गाणे ऐकावेच लागते ... ' 'तदबीर ' चित्रपटातील संगीतकार लाल मोहम्मद यांनी स्वरबद्ध केलेले ' मैं पंछी आज़ाद मेरा कहीं दूर ठिकाना रे , इस दुनिया के बाग में मेरा आना - जाना रे ' हे गीत अधिक वेगळे काही सांगत नाही ... या गीताचा अंतराही पुरेसा संदेश देतो ... ' जीवन की परभात में आऊँ , सांज भये तो मैं उड जाऊँ , बंधन में जो मुझको बांधे वो दिवाना रे ' हे...

बॅरिस्टर नानाभॉय ऊर्फ नानी अर्देशीर पालखीवाला

Image
नानी पालखीवाला बॅरिस्टर नानाभॉय ऊर्फ नानी अर्देशीर पालखीवाला ( १६ जानेवारी १९२० - ११ डिसेंबर २००२ ) हे भारतातील कायदेपंडित ,  घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते . त्यांची भारताच्या अर्थसंकल्पांवरची दरवषींची भाषणे अत्यंत लोकप्रिय होती . ही भाषणे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमसारख्या मोठ्या मैदानांवर व्हायची . भाषणे ऐकायला पांढरपेशा सुशिक्षित श्रोत्यांची गर्दी होत असे . नानी पालखीवाला यांनी  १९७७ ते  १९७९ या कालावधीत भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणूनही काम पाहिले . भारत सरकारने त्यांना १९९८  मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले . नानींचा जन्म मुंबई येथे १९२० मध्ये  एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात  झाला . त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील मास्टर्स ट्युटोरियल हायस्कूल व सेंट झेविअर हायस्कूल येथे झाले . मुंबई विद्यापीठात लेक्चरर म्हणून नोकरी करण्याची त्यांची इच्छा होती . पण तेथे त्यांची निवड झाली नाही . मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून त्यांनी पुढे शिकत राहण्याचा निर्णय घेतला . पण तोपर्यंत सगळीकडचे प्रवेश बंद झाल्यामुळे नाइलाजाने त्यांनी मुंबईच्या गव्हमेंट लॉ क...

माझा धनगरवाडा : वाचायला हवं असं आत्मकथन

Image
धनंजय धुरगुडे यांचं हे आत्मकथन नुकतंच वाचून पूर्ण केलं ... धनगर समाजाचं वास्तववादी चित्रण अन लेखकाच्या वडिलांचं शिक्षणबाबतचं पॅशन ... त्यातून घडत गेलेलं जीवन ... शिक्षणानं दिलेली नवी दृष्टी ...शेळ्या - मेल्यांसोबत आपला कुरंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो , आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं ... वादळवारा असो , वा सतत बदलणारा मुकाम असो ,  काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करते ... नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं ... शिक्षणासाठी प्रसंगो मोलमजुरी करून ' बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच ' असा निर्धार करतं आणि स्वत : च स्वत : ला प्रेरित करत राहतं ! आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन . . . या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी - चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात ... त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ , गजीनृत्य व सण - उत्सव यांचं शब्दचित्र यात रेखाटलेलं आहे ... शिक्षणामुळे झालेला कुटूंबाचा विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन लेखक ...

समाजसुधारक महादेव गोविंद रानडे

Image
महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन . न्या . रानडे यांचा जन्म १८ जानेवारी १८४२ रोजी झाला तर मृत्यू १६ जानेवारी १९०१ रोजी झाला . जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला. त्यांचे मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले. तर माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईस झाले. १८६२ मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पुन्हा बी. ए. परीक्षा दिली. १८६४ मध्ये एम्. ए. ची परीक्षा दिली व १८६५ मध्ये कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. १८६६ च्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली. १८६८ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. पुण्यास न्यायखात्यात १८७१ पासून न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर १८९३ मध्ये रानड्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली. न्यायमूर्ती रानडे यांचे दोन विवाह झाले होते. एक वयाच्या बाराव्या वर्षी आणि प्रथम पत्नी वारल्यावर दुसरा विवाह एकतिसाव्...

हिरा बनसोडे : प्रगल्भ जाणिवेची कवयित्री

Image
हिरा बनसोडे या मराठी कवयित्री आहेत. त्यांचे ‘पौर्णिमा’, ‘फिर्याद’, ‘फिनिक्स’ हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. बौद्ध स्त्री साहित्यिकांमध्ये त्यांचा विशेष उल्लेख होतो. 'अस्मितादर्श' या नियतकालिकात कविता लिहिणार्‍यांमध्ये हिरा बनसोडे सुप्रसिद्ध आहेत. ‘पौर्णिमा’मधील कविता म्हणजे तारुण्यसुलभ हळव्या भावभावनांचा कल्लोळ. कधी प्रेमाची नजाकत, विरहाची अवीट हुरहूर, तर कधी जीव गुदमरून टाकणा-या प्राणांतिक वेदना. भावविभोर अशा या उत्कट भावना मृगजळाचा भाव वेल्हाळपणा घेऊन त्यात वाचायला मिळतात; पण केवळ सौंदर्यनिर्मिती आणि रंजकत्व निर्माण करणे हे साहित्याचे उद्दिष्ट नसते; तर समाजाच्या वास्तवाचे भान ठेवून मानवी मनाचे, वृत्ती-प्रवृत्तीचे, न्याय-अन्यायाचे विविधांगी दर्शन घडवणे ही साहित्यनिर्मितीची भूमिका असते. रूढ चौकटीत राहून हे करता येत नाही. तेव्हा त्याची मोडतोड होते, दृढ ठोकताळे बाजूला सरकवावे लागतात. तेव्हाच कुठे ख-या अर्थाने स्वतंत्र शैली निर्माण होते. पुढे समज-उमज वाढल्यावर प्रगल्भ जाणिवांची परिपक्व कविता हिराताईंनी लिहिली आणि त्यांची स्वतंत्र शैली त्यांना निर्माण करता आली. कुणीच नसले...

य.दि फडके : वैचारिक लेखनाचे वारसदार

Image
य . दि . फडके व्यक्तिविशेष वैचारिक आणि इतिहासपर लेखन करणारे , महाराष्ट्राला लाभलेले ज्येष्ठ लेखक ... राजवाडे आणि सरदेसाई या इतिहासकारांचे वारस म्हणून संबोधले जाणारे संशोधक व विचारवंत म्हणजे डॉ . य . दि . फडके होतं ... काही काळ शिक्षक म्हणून काम केलेल्या डॉ . यशवंत दिनकर फडके यांचा जन्म सोलापुरात झाला ...१९५५ मध्ये पुणे विद्यापीठातून बी . ए . ( ऑनर्स ) पूर्ण केल्यानंतर १९५३ मध्ये अर्थशास्त्र तर १९५८ मध्ये राज्यशास्त्र यामध्ये य . दि . फडक े यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलं ... ३७ वर्षांच्या त्यांच्या अध्यापनाच्या कालखंडात मुंबई आणि पुणे या विद्यापीठांतील राज्यशास्त्र विभागात त्यांनी प्रपाठक , प्राध्यापक म्हणून काम केलं ... मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्थेत १९८४ ते १९९१ या कालावधीत सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केल्यानंतर य . दि . फडके यांनी सेवानिवृत्ती घेतली ... आपली मते परखडपणे मांडणाऱ्या डॉ . फडके यांना फिलाडेल्फिया येथील टेंपल विद्यापीठाच्या ' सेंटर फॉर द स्टडी ऑफ फेडरॅलिझममध्ये ' ज्येष्ठ फुलब्राईट संशोधक म्हणून संशोधन करण्याची संधी १...