स्मरण समाज सुधारक टक्कर बाप्पांचे ...!!!
समाजसुधारक ठक्कर बाप्पा अर्थात अमृतलाल ठक्कर यांची आज पुण्यतिथी त्यांना विनम्र अभिवादन ... !!!
दलित आदिवासीच्या जीवनात प्रकाश पडावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख व्हवी ... महात्मा गांधींच्या अस्पृश्यता निवारणाच्या कामात सदैव त्यांच्या सोबत राहून काम केलेले महात्मा गांधीजीचे सहकारी होते ...
गुजरातमधील सौराष्ट्रातील भावनगर येथे 29 नोव्हेंबर 1869 रोजी जन्म झाला तर 20 जानेवारी 1951 रोजी त्यांचा मृत्यू झाला ... अमृतलाल टक्कर हे त्यांच्या वडिलांचे नाव होतं ...आदिवासी कुटूंबात जन्म झालेल्या बाप्पा टक्कर यांच्या कुटूंबाची सांपत्तिक स्थिती उत्तम होती ... त्यामुळं त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे ...पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधून 1890 मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी एल सी इ अर्थात LCE Licenciate in Civil Engineering हल्लीची बी इ ( B. E . )Graduate in Civil Engineering प्राप्त केली होती ...
ठक्कर बाप्पांनी महाराष्ट्रातील तत्कालीन सांगली सवस्थानात मुख्य अभियंता म्हणून काम केलं होतं ...त्यानंतर त्यांनी तेंव्हाच्या बॉम्बे पालिकेतही अभियंता म्हणून काम केले ... मुंबईतील स्वच्छता कामगारांच्या वसाहतींना भेट देण्याचा योग आला तेव्हा तेथील रहिवाश्याची परिस्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटले ...त्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी सुविधांसह वसाहत केली होती ... त्यानंतर ते इस्ट आफ्रिकेतील युगांडा मध्ये गेले तेथे त्यांनी रेल्वेचे रूळ टाकण्याचे कंत्राट घेऊन ते काम पूर्ण केले ...तेथे त्यांचे मन रमले नाही ...त्यानंतर ते 1914 मध्ये भारतात परतले ...
गोपाळ गणेश गोखले यांच्याकडून समाज सेवेची प्रेरणा घेतली ... 1914 मध्येच त्यांनी समाज सेवेला सुरुवात केली ...आणि याच वर्षी त्यांना " भारत सेवक समाज " ची स्थापना केली ...
त्यानंतर महात्मा गांधी यांच्या सोबत अस्पृश्यता निवारणाच्या कामास सुरुवात केली ... त्यासाठी " अस्पृश्यता निवारण संघा " ची स्थापना केली ... कालांतराने त्याचे नाव " हरिजन सेवक संघ " असे करण्यात आले ... अस्पृश्य आणि आदिवासी यांच्या जीवनमन उंचावण्यासाठी त्यांनी काम केले ... त्यासाठी शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले ... ते संसद सदस्यही होते ...
त्यानंतर महात्मा गांधी यांच्या सोबत अस्पृश्यता निवारणाच्या कामास सुरुवात केली ... त्यासाठी " अस्पृश्यता निवारण संघा " ची स्थापना केली ... कालांतराने त्याचे नाव " हरिजन सेवक संघ " असे करण्यात आले ... अस्पृश्य आणि आदिवासी यांच्या जीवनमन उंचावण्यासाठी त्यांनी काम केले ... त्यासाठी शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले ... ते संसद सदस्यही होते ...
आदिवासी आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले ...भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हेही या आयोगाचे सदस्य होते ...दलितांबरोबरच आदिवासीच्या विकासात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान राहिले ... एस सी आणि एस टी च्या घटनात्मक अधिकारी तरतूद बाबासाहेबांनी केली ...त्यात काही ठिकाणी टक्कर बाप्पाचे सहकार्य लाभले हिते ... पण ठक्कर बाप्पांनी गांधीजींच्या तत्वांनीच अदिवासींची सेवा केली ... तथापि , टक्कर बाप्पा हे दुर्लक्षित राहिले आहेत ... आदिवासींसाठीच्या काही योजनांना त्याचं नाव दिलं आहे ...त्यामुळं काहींना त्यांचं नावं कळलं आहे पण त्याच आदिवासींसाठी त्यांनी केलेल्या कार्याची फारशी माहिती आणि जाणीव नव्या पिढीला नाही ती करून देण्याची गरज आहे ...
यशवंत भंडारे ,
20 जानेवारी 2020
20 जानेवारी 2020
Comments
Post a Comment