सतीश जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!!!
सतीश जाधव म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील बुद्धिमान आणि हुशार अधिकारी ... मी महासंचालनालयात 1999 मध्ये मंत्रालयात रुजू झालो तेव्हा ते माझे वरिष्ठ सहकारी होते ...वृत्त शाखेत आम्ही काम करीत असू ... माझ्या सोबत सदाशिव कांबळे , अनिरुद्ध अष्टपुत्रे हेही होते ... वृत्त शाखेतील बातम्यांचे संपादन करून वेळेत रायडर मार्फत वृत्तपत्र आणि इतर माध्यमांना फोटो आणि बातम्या पाठवाव्या लागत ...तसेच दूरदर्शन ला मंत्रालयातील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या बैठका , कार्यक्रम तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यातून पोष्टाने येणाच्या कसेट पाठवावयाच्या असत या कामी सतीश जाधव आम्हास मदत तर करत असतच परंतु मराठी भाषा नेमकेपणान वापरण्यावर त्यांचा भर असे ...कोणतीही क्लिष्ट गोष्ट सोपी करण्यातही त्यांची मदत होत असे ... पुणे विद्यापीठातून अर्थात आताच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून वाणिज्य आणि पत्रकारितेची पदवी घेतलेल्या जाधव यांचं वाचनही खास होतं ...वौचरिक विषयांवर त्यामुळं छान गप्पा जमत ...मित भाषी सतीश जाधव कधीही त्यांच्या जीवनातील दुःखाचा कोपरा उघड करत नसतं ... त्यांच्या खास हास्य शैलीतून ते वैक्तीक जीवनाचा एक भाग त्यांनी रिझर्व्ह ठेवला होता तेथे कुणास फार वावर नव्हता ...आमचे मित्र गोपाळ चिप्पलकट्टी हे केंद्र शासनाच्या सेवेत मुंबईत असे पर्यत तेच त्यांचे चांगले सवंगडी होते ....ते मुंबईतून बदलून गेल्या नंतर सतीश जाधव एकटे पडले असावेत ...त्यांच्यात एक अस्वस्थ मन होतं ते त्यांना बेचैन करी तेव्हा ते कार्यालयात येतच नसावेत ...पण काही दिवसांनी पुन्हा हजर होऊन कमला लागत असतं ... तत्कालीन संचालक प्रल्हाद जाधव , श्रद्धा बेलसरे , महासंचालक त्यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा त्यांच्यावर खास लळा होता ... सातारा जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती ...ते माझे फेसबुक फ्रेंड होते म्हणून आज आता थोडया वेळापूर्वी त्यांचे फेसबुक अकाऊंट चेक केलं तर त्यावर त्यांचा एकही फोटो आढळून आला नाही .... अलोक जत्रातकर यांच्या एका लेखात सोबतचा फोटो सापडला ...फेसबुकवर अनेकांचे आवडलेले लेख , माहिती त्यांनी शेअर केलेली दिसली ... 1 जुलै 2961 रोजी जन्मलेल्या सतीश जाधव यांचं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले हे गाव . तेथील मॉडर्न हायस्कुलमध्ये त्याचं शालेय शिक्षण झालं होतं ...त्यांनी काल गावाचा आणि या जगाचा निरोप घेतला ...माझ्यासारख्या अनेक मित्रांच्या सहवासातील आठवणी तशाच ठेऊन ...
Comments
Post a Comment