कुंदनलाल सैगल
कुंदनलाल सैगल हे महान गायक आणि नट होते ... 18 जानेवारी 1947 रोजी त्यांचं निधन झालं ...त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!!!
कुंदनलाल सैगल यांनी अवघ्या पंधरा - सोळा वर्षाच्या कालखंडात संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला ... त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो ... ' जब दिल ही टूट गया ' हे ' शाहजहाँ ' चित्रपटातील गीत ऐकताना ' हम जी के क्या करेंगे ' मधील ' क्या ' हा स्वर गाताना उदास , हतबल आणि सकारण असा उच्चार हे सारेच भिडल्यावाचून राहत नाही ...
दोन्ही अंतांमध्ये ' इक भेदी लूट गया ' किंवा ' हर साथी छूट गया ' ही विफलता समजण्यासाठी मूळ गाणे ऐकावेच लागते ... ' 'तदबीर ' चित्रपटातील संगीतकार लाल मोहम्मद यांनी स्वरबद्ध केलेले ' मैं पंछी आज़ाद मेरा कहीं दूर ठिकाना रे , इस दुनिया के बाग में मेरा आना - जाना रे ' हे गीत अधिक वेगळे काही सांगत नाही ... या गीताचा अंतराही पुरेसा संदेश देतो ...
' जीवन की परभात में आऊँ , सांज भये तो मैं उड जाऊँ , बंधन में जो मुझको बांधे वो दिवाना रे ' हेच सैगल यांच्याबाबतीत खरे आहे.. . सैगल हे त्या काळचे सर्वात लोकप्रिय गायक ...त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ' गोल्डन व्हॉइस ' म्हणायचे ... सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत ...त्यांच्या गैरफिल्मी गजलासुद्धा फार श्रवणीय आहेत ...
Comments
Post a Comment