माझा धनगरवाडा : वाचायला हवं असं आत्मकथन


धनंजय धुरगुडे यांचं हे आत्मकथन नुकतंच वाचून पूर्ण केलं ... धनगर समाजाचं वास्तववादी चित्रण अन लेखकाच्या वडिलांचं शिक्षणबाबतचं पॅशन ... त्यातून घडत गेलेलं जीवन ... शिक्षणानं दिलेली नवी दृष्टी ...शेळ्या - मेल्यांसोबत आपला कुरंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो , आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं ... वादळवारा असो , वा सतत बदलणारा मुकाम असो , काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करते ... नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं ... शिक्षणासाठी प्रसंगो मोलमजुरी करून ' बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच ' असा निर्धार करतं आणि स्वत : च स्वत : ला प्रेरित करत राहतं ! आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन . . . या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी - चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात ... त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ , गजीनृत्य व सण - उत्सव यांचं शब्दचित्र यात रेखाटलेलं आहे ... शिक्षणामुळे झालेला कुटूंबाचा विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन लेखक घडवतो ... एका धनगराने अस्सल धनगरी शैलीतील हे आत्मकथन नक्की वाचावयास हवं ...
*** यशवंत भंडारे
16 जानेवारी 2020

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?