य.दि फडके : वैचारिक लेखनाचे वारसदार




य . दि . फडके व्यक्तिविशेष वैचारिक आणि इतिहासपर लेखन करणारे , महाराष्ट्राला लाभलेले ज्येष्ठ लेखक ... राजवाडे आणि सरदेसाई या इतिहासकारांचे वारस म्हणून संबोधले जाणारे संशोधक व विचारवंत म्हणजे डॉ . य . दि . फडके होतं ... काही काळ शिक्षक म्हणून काम केलेल्या डॉ . यशवंत दिनकर फडके यांचा जन्म सोलापुरात झाला ...१९५५ मध्ये पुणे विद्यापीठातून बी . ए . ( ऑनर्स ) पूर्ण केल्यानंतर १९५३ मध्ये अर्थशास्त्र तर १९५८ मध्ये राज्यशास्त्र यामध्ये य . दि . फडके यांनी पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलं ... ३७ वर्षांच्या त्यांच्या अध्यापनाच्या कालखंडात मुंबई आणि पुणे या विद्यापीठांतील राज्यशास्त्र विभागात त्यांनी प्रपाठक , प्राध्यापक म्हणून काम केलं ... मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्थेत १९८४ ते १९९१ या कालावधीत सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केल्यानंतर य . दि . फडके यांनी सेवानिवृत्ती घेतली ... आपली मते परखडपणे मांडणाऱ्या डॉ . फडके यांना फिलाडेल्फिया येथील टेंपल विद्यापीठाच्या ' सेंटर फॉर द स्टडी ऑफ फेडरॅलिझममध्ये ' ज्येष्ठ फुलब्राईट संशोधक म्हणून संशोधन करण्याची संधी १९८४ मध्ये उपलब्ध झाली ... डॉ . फडके यांच्या सहा पुस्तकांना शोध बाळगोपाळांचा , व्यक्ती आणि विचार , केशवराव जेधे , शोध सावरकरांचा , लोकमान्य टिळक , क्रांतिकारक आणि आंबेडकरी चळवळ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार मिळाले आहेत ...आज य . दि . फडके यांची आज जयंती , त्यांना विनम्र अभिवादन ...💐💐💐💐💐
यशवंत भंडारे , 3 जानेवारी 2020
औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?