डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लाला लजपत राय यांच्यावरील अग्रलेख ...!!!
लाला लजपत राय यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ... !!!
*****
लाला लजपत राय यांचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लाहोर , पंजाब ( ब्रिटिश भारत ) येथे निधन झालं ... डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी पाक्षिक " बहिष्कृत भारत " मध्ये त्यांच्यावर मृत्यू लेख लिहिला ... बाबासाहेबांच्या वृत्तपत्रीय एकूण लेखनात त्यांनी मोजकेच मृत्यू लेख लिहिले आहेत ... परंतु त्यांचा दर्जा उच्च कोटींचा आहे ... लाला लजपत राय यांच्या राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना आपुलकी होती ... ती या मृत्यू लेखात व्यक्त झाली आहे ... लाला लजपत राय यांची ही १५५ वी जयंती आहे ... माझ्या अभिवादाना सोबत मुद्दाम देत आहे ...बाबासाहेब यांच्या अनुयायांना हा लेख नक्की आवडेल ...
लाला लजपत राय यांचे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी लाहोर , पंजाब ( ब्रिटिश भारत ) येथे निधन झालं ... डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी पाक्षिक " बहिष्कृत भारत " मध्ये त्यांच्यावर मृत्यू लेख लिहिला ... बाबासाहेबांच्या वृत्तपत्रीय एकूण लेखनात त्यांनी मोजकेच मृत्यू लेख लिहिले आहेत ... परंतु त्यांचा दर्जा उच्च कोटींचा आहे ... लाला लजपत राय यांच्या राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांना आपुलकी होती ... ती या मृत्यू लेखात व्यक्त झाली आहे ... लाला लजपत राय यांची ही १५५ वी जयंती आहे ... माझ्या अभिवादाना सोबत मुद्दाम देत आहे ...बाबासाहेब यांच्या अनुयायांना हा लेख नक्की आवडेल ...
*****
प्रासंगिक विचार
देशभक्त लाला लजपतराय यांस गेल्या महिन्याच्या १७ तारखेस एकाकी काकी हृदयक्रिया बंद पडून मृत्यु आला , ही गोष्ट नमूद करण्यास आम्हास अत्यंत दुःख होत आहे . सायमन कमिशन लाहोरला गेले असता त्याला परत जा म्हणन सांगण्याकरिता जी बहिष्कारवादी लोकांची चमू स्टेशनवर उपस्थित झाली होती तिच्या अग्रभागी लालाजी होते . गर्दी मागे हटविण्याचा प्रयत्न करीत असता अका पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठी मारली . हा लाठीचा आघातच लालाजींची हृदयक्रिया बंद होण्यास कारणीभूत झाला असे डॉक्टर लोकांचे मत आहे . ते खरे असल्यास असल्या उन्मत्त व राक्षसी वृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे . ते काही असो , लालाजींच्या मृत्युमुळे देशातील एक कर्तबगार पुढारी नाहीसा झाला यात मात्र शंका नाही . हिंदुस्थानला राजकीय पुढाऱ्यांची वाण कधीच पडली नाही . पण लालाजींसारखे प्रामाणिक वृत्तीचे , स्वार्थत्यागी व हाती घेतलेल्या कामात तनमनधन खर्च करणारे पुढारी फारच थोडे . पुढारीपणाला हपापलेले व त्याच्यासाठी आपली सदसद्विवेक बुद्धी सैतानाला विकणारेच फार . यांच्या अक्तिकृतीत कमालीचा विसंगतपणा असायचा व तो लोकांच्या ध्यानात आला म्हणजे ' मेंटल रिझर्वेशन ' ची बात झोकून हे मोकळे व्हावयाचे , पण लालाजींच्या आयुष्यक्रमात हा प्रकार आढळत नाही . नर्सिपंती ( नरसिंह चिंतामण केलकरांसारखा ) दुटप्पीपणा व अय्यंगारछाप " लफंगेपणा लालाजींना माहीत नव्हता . त्यांची कार्यक्षमता दांडगी होती . जास्त । बडबड व गडबड न करता धिम्मेपणाने अंगिकृत कार्य पार पाडणे यात लालाजींच्या या चारित्र्याचे वैशिष्ट्य आहे . लालाजींचा जन्म पंजाब प्रांतात अका गरीब वैश्य कुलात १८६५ साली झाला . उदारमतवादानचे बाळकडू पाजले गले . आज आर्यसमाजाला ' सनातन धर्मा ' ने गिळंकृत केले आहे . पण त्याकाळी आर्यसमाज आणि ' सनातन धर्म ' यांचा उभा दावा होता . कारण त्याकाळी आर्यसमाज मुसलमानांच्या अतिक्रमणापेक्षा जातिमभेदादि हिंदू समाजातगत लक्ष देत असे . त्यामुळे जरी - पुराण्या लोकांना तो साहजिकपणेच अप्रिय होता . पुराणमतवाद व आयसमाज यांच्या या लढ्यात लालाजींनी आर्य समाजाची बाजू घेतली व त्या समाजाची तत्त्वे दृढमूल करण्यासाठी त्यांनी काहा मित्रांच्या साह्यानं १८८६ साली दयानंद अग्लोवेदिका कॉलेजची स्थापना केली . यांच्या सार्वजनिक आयुष्यक्रमाला आरंभ याच गोष्टीने झाला . ही संस्था उर्जितावस्थेस अणण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत केली व पूष्कळ स्वार्थत्याग केला .आज ही संस्था पंजाबात एक प्रमुख शिक्षणसंस्था म्हणून गणली जाते . यानंतर ते राजकीय चळवळीतही भाग घेऊ लागले . पण अितर चालवल्याप्रमाणे त्यांनी राजकारण व समाजकारण यांची फारकत करून आपल्या पंगूपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही . दोन्ही बाबतीत ते क्रांतिकारक होते . राजकीय चळवळीत पडल्यामुळे सरकारने जेव्हा त्यांना अंदमानला पाठविले त्यावेळी बऱ्याच पुराणमतवादी लोकाना आनंद झाला होता हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे .कार सरकार व पुराणमतवादी लोक यांच्या विरोधातन अशा रीतीने लालाजींनी आपला सार्वजनिक कार्यक्रम चालविला . पंजाबातील काही स्पश्य वर्गीय पुढाऱ्यांनी चालविलेल्या अस्पृश्याच्या स्पृश्याकरणाच्या चळवळीत ते मनापासून भाग घेत . स्पृश्यवर्गीय लोकांनी चालविलेल्या ' ' अस्पृश्योद्धारा ' च्या चळवळी आम्हाला जरी पूर्णतः समाधानकारक वाटत नसल्या तरी लालाजींची सहानुभूती प्रामाणिकपणाची होती याबद्दल आम्हाला शंका वाटत नाही . आमच्या दृष्टीने ती अपुरी असली तरी अविश्वसनीय खास नव्हती . लालाजी हे अत्तम लेखकही होते . सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांनी उनेक ग्रंथ लिहिले आहेत . ' दी पीपल ' नावाचे अिंग्रजी पत्र ते चालवीत होते . त दयानंद कॉलेजशिवाय त्यांनी स्थापन केलेली दुसरी संस्था म्हणजे सर्व्हन्ट्स ऑफ " पीपल सोसायटी ही होय . मंबीच्या सव्हंटस् ऑफ अिडिया सोसायटीच्या धर्तीवर या संस्थेची घटना केलेली असली तरी दोहोंच्या अंतरंगात महत्त्वाचा भेद आहे . बीची सोसायटी नेमस्त ' लोकांच्या ताब्यात असल्यामुळे तिचा सर्वच कार्यक्रम मस्तपणाचा आहे . राजकीय बाबतीत नेमस्तपणा व सामाजिक बाबतीतही नेमस्त अक पाल पुढे टाकण्याच्या पूर्वी दहा तास विचार करावयाचा अशा प्रकारचा पचा कार्यक्रम आहे . या संस्थेचे काही सभासद व्यक्तिशः जहाल पुरान ल पण ' जातीश : ' त्यांना नेमस्तपणाच्या चाकोरीतून घुटमळत राहण च्या अलट लाहोरच्या सोसायटीला लालाजीसारखा तडफदार नेता सर्वागिण प्रगतीपर स्वरूप प्राप्त झाले आहे . सामाजिक व राजकीय बाबतीत सारखेच प्रगमनशील कार्यकर्ते तयार करण्याचे कार्य ही सोसायटी धडाडीने करीत आहे . या संस्थेसाठी त्यांनी पुष्कळ झीज सोसली . अशा प्रकारे लालाजींचे चारित्र्य अनेकांगी आहे . सामाजिक , राजकीय , शैक्षणिक अित्यादि सर्व क्षेत्रात ह्यांनी अमोल कार्य करून ठेवले आहे आणि ते कालवश झाले असले तरी त्यांचे बहुविध विधायक कार्य त्यांचे जिवंत स्मारक म्हणून राहणार आहे .
*****
*****
लाला लजपत राय भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर क्रांतिकारक नेते ... त्यांचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके ( जागरों तहसील ) या गावी जैन -अग्रवाल घराण्यात २८ जानेवारी १८६५ रोजी झाला ... धार्मिक सहिष्णुतेच्या वातावरणात वाढत असलेल्या लजपतरायांनी मिशन हायस्कूलमधून शिक्षण घेऊन पुढे एल्एलबी ही पदवी मिळविली ( १८८६ ) आणि अल्पकाळातच यशस्वी वकिल म्हणून त्यांना मान्यता मिळाली ... ते सक्रिय आर्य समाजवादी झाले ... अर्जविनंत्यांचे नेमस्त राजकारण चालविणाऱ्या काँग्रेसबद्दल त्यांना सहानुभूती वाटेना ... १९०४ मध्ये पंजाबी नावाचे पुढे विख्यात झालेले वृत्तपत्र सुरू करून पंजाबचे प्रतिनिधी म्हणून ते काँग्रेस अधिवेशनास गेले ... अनेक वर्षे सत्तारूढ असलेला कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष निवडणुकत १९०५ मध्ये हरला ... नव्या उदारमतवादी पक्षाबद्दल काँग्रेसच्या नेमस्त नेत्यांना फार आशा होत्या ... त्यामुळेच डिसेंबरच्या बनारस काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात गोखल्यांनी फाळणीला विरोध करूनही एकण सौम्य भाषा वापरली ... त्या वर्षी देशात दुष्काळ पडला होता व कर्झनशाहीमुळे लोक त्रस्त झाले होते ... या कारणांसाठी ब्रिटिश युवराजांचे स्वागत करणाऱ्या पहिल्याच ठरावाला लालाजींनी तीव्र विरोध केला ... त्यांना लोकमान्य ' टिळक व बिपिनचंद्र पाल यांसारख्या जहाल नेत्यांचाही पाठिंबा मिळाला ... खुल्या अधिवेशनात या ठरावावरील चर्चेचे वेळी जहाल नेते अनुपस्थित राहिले ... बंगाल फाळणी आणि कर्झनशाहीच्या निषेधार्थ लाखो लोकांचे भव्य निदर्शन करावे , ही मागणीही लालाजींनी केली ... १९०६ मध्ये जहालांनी ब्रिटिश मालावर साऱ्या देशभर बहिष्कार टाकण्यासाठी प्रचाराची मोहीम उघडली ... पुढील वर्षी लालाजींनी पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रश्न धसाला लावला ... १८५७ च्या संग्रामाच्या सुवर्णजयंतीसाठीही त्यांनी लोकजागृती सुरू केली ... लालाजींना " पंजाबचा सिंह " तथा " पंजाब केसरी " म्हणून गौरविण्यात येऊ लागले . १९२८ च्या फेब्रुवारीमध्ये केंद्रीय असेंब्लीत सायमन कमिशनवर सर्व ब्रिटिश सदस्य सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता ... तो बहुमताने संमत झाला ...
***** यशवंत भंडारे , लातूर
दि.२८ जानेवारी २०२०
दि.२८ जानेवारी २०२०
Comments
Post a Comment