विचारवंत मे. पु .रेगे


महाराष्टातील मोजक्या विचरवंतांपैकी एक असलेल्या मे . पुं . रेगे तथा मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला ... तर २८ डिसेंबर २००० रोजी त्यांचं निधन झालं ... ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते ... ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते ... मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले ... त्यांनी मराठी भाषिकांना पाश्चात्त्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला ... ' पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास ' , ' तत्त्वज्ञानातील समस्या ' ही भाषांतरे , ' नवभारत ' ( मासिक ) मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्त्य तत्त्वज्ञानविषयक आणि तत्त्ववेत्त्यांच्या नोंदी पाहता , रेगे यांच्या कार्याची , त्यांचे तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची खात्री पटेल ... भारतीय दर्शने , ग्रीक पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि इतर अनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती ... मे . पुं . रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते ... ते ' नवभारत ' ( मासिक ) आणि ' न्यू क्वेस्ट ' या मासिकांचे संपादकही होते .... त्याचप्रमाणे ते ' मराठी तत्त्वज्ञान महाकोश ' या प्रकल्पाच्या संपादक मंडळात होते ... महात्मा जोतीराव फुले , लोकहितवादी , न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची तात्विक मांडणीही त्यांनी केली ... गुजरातमध्ये प्राध्यापक असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर 1950 मध्ये तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले ...मिलिंद मध्ये ते 1954 पर्यत होते ...

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?