भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मराठी हस्त अक्षर




आज 
२३ जानेवारी 2020 हस्त अक्षर दिन ... भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं हे मराठी हस्त अक्षर ... याच हस्त अक्षरांतून विचारांची पेरणी करत सामाजिक परिवर्तनाची स्फुलिंग पेटवण्याची क्रांती बाबासाहेब यांनी केली ...मराठी भाषेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्टातील मराठी भाषिकांशी लेखणी आणि वाणीने सवांद साधला ... पण ग्रंथ लेखन मात्र इंग्रजी भाषेत केलं ... असं म्हणतात बाबासाहेब इंग्रजीत विचार करत आणि लिहीत असतं ... मराठीत लिहितानाही प्रथम इंग्रजीत लिहून मग त्याचं अस्सल मराठीत भाषांतर करत ...पण त्याचं मराठी लेखन वाचताना चुकूनही हे भाषांतरित लेखन असावं असं वाटतं नाही ... हस्त अक्षरावरून माणसाचा स्वभाव , भाव - भावना कळतात असंही म्हणतात ... बाबासाहेबांचं हस्त अक्षर त्यांच्या विचारांचा आरसा आहे ...

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?