ग्रेटाची हाक
ज्येष्ठ पत्रकार , लेखक आणि पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांच्या " ग्रेटाची हाक ... तुम्हाला ऐकू येतेय ना " या पुस्तकाचं अलीकडेच पुण्यात प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन झालं ... हे पुस्तक काल कार्यालयात भेटून त्यांनी भेट दिलं ... ग्रेटा पर्यावरण संरक्षणासाठी , जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी ,कार्बनउत्सर्जन कमी करून शून्यावर आणण्यासाठी शाळेत जाण्यास नकार देऊन जगाला याकामी आर्त हाक देतेय ...अशा बातम्या अलीकडे वाचतांना ग्रेटाचं " ग्रेटपण " दिसून येत होतं ...तिच्याबद्दल मिळेल तसं वाचत असताना मुंबई दौऱ्यात तिच्याबद्दलच्या पुस्तकाचा शोधही घेतला पण असं पुस्तक मिळालं नाही ...दरम्यान अतुल देऊळगावकर यांच्या पुस्तक प्रकाशनाची बातमी वाचली अन आनंद झाला ... ,अतुल देऊळगावकर यांचा या क्षेत्रातील अधिकार असल्यानं हे पुस्तक खूप छान झालंय ...प्रकाशकानं खूप मेहनत घेतलीय हे दिसून येतंय ...पुस्तक वाचून पुन्हा त्यावर व्यक्त हिणार आहेच ...तूर्तास धन्यवाद अतुलजी ...
Comments
Post a Comment