माझ्या संग्रहातील संविधान .... इतर ग्रंथ ...!!!


प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!
माझ्या वैयक्तिक संग्रहात संविधानाच्या सहा प्रती आहेत ...त्यातील भारत सरकार पाठय पुस्तक मुद्रणालयानं मुद्रित केलेली आणि नियंत्रक , भारत सरकार , सिव्हिल लाईन्स , नवी दिल्ली यांच्यातर्फे 1996 मध्ये प्रकाशित केलेली ...तसेच महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाद्वारे अनुवादित आणि संचालक , शासन मुद्रण व लेखन सामग्री , महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे भारत सरकारच्या वतीने मुद्रित व प्रकाशित 2014 ची प्रत माझ्या संग्रही आहे ... 1996 ची संविधानाची प्रत मी 1997 मध्ये संसद भवन , नवी दिल्ली येथून विकत घेतली होती ... संविधानासंबंधीत 20 पेक्षा जास्त ग्रंथ मराठी ,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील माझ्या संग्रही आहेत ... संविधानासंबंधीत काही ग्रंथ प्रामुख्यानं इंग्रजी भाषेततील मुलाकडे आहेत ...तर काही ग्रंथ आज सापडली नाहीत ...
संविधान परिषदेनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारलं ... आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आणण्याचा निर्णय ही घेतला ... 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ...म्हणजेच या दिवसापासून देशात प्रजेचं राज्य सुरू झालं ...याचं दिवसापासून सरकारनं सविधानानुसार काम करण्यास सुरुवात केली ... संविधान परिषदेची पहिली बैठक 9 डिसेंम्बर 1946 रोजी घेण्यात आली ... डॉ .राजेंद्र प्रसाद हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते ...डॉ राजेंद्र प्रसाद हेच संविधान परिषदेचे अध्यक्ष होते ...लेखन समितीतील एक सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान लेखन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली ...त्यांची अहोरात्र अभ्यास आणि लेखन करून संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला ... म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते ...आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण न होणे म्हणजे त्यांच्या प्रतीची कृतघ्न होणे होय ...प्रजासत्ताक चिरायु होओ ...भारतीय सविधानही चिरायु होओ ...म्हणताना येणारं फिलिंग काही और असतं ... यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत 4 नोव्हेंबर 1948 रोजी केलेल्या भाषणातील त्यांचं प्रतिपादन लक्षात घेण्यासारखं आहे ... बाबासाहेब म्हणाले होते " ... किसीं भी संविधान को संपूर्ण नही कहा जा सकता . जो संविधान मसौदा समिती ने तयार किया है वह इस देश में शुरुआत के तौर पर काफी बढिया है .मेरा ख्याल है यह कामचलाऊ तथा लचीला है . यह शांती और युद्ध के समय देश को इकट्टा बनाए रखाने मे समर्थ है . यदी नए संविधान से कुछ गलत काम होंगे तो इसाका मतलब यह नहीं होगा कि हमरा संविधान बुरा हौ , हमे कहना पडेगा कि इंसान ही दुष्ट था ... "
जय भारत ...!!!
जय महाराष्ट्र ...!!!

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?