संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन
जागतिक विज्ञान दिन : संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोण कोणासाठी...? आज 10 नोव्हेंबर अर्थात अनेक दिन विशेष असण्याबरोबर *जागतिक विज्ञान दिन* सुद्धा आहे ... भारतीय संविधानात वैज्ञानिक विचार अंगिकारण्याचा नि तो वाढीस नेण्याची जबाबदारी नागरिकांबरोबरच संविधानिक संस्थावर टाकली आहे ... भारतीय नागरिकांचा विवेक जागृत रहावा ... त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं विचार करावा ...अंधभक्तीनं कुठलीही गोष्ट स्वीकारु नये... कोणतीही गोष्ट घडण्यामागं वैज्ञानिक कारणं असतात ...कारण कारक भाव असतो ...त्यामागची कारणं चिकित्सकपणे शोधण्याचा प्रयत्न करू नये ... अंध श्रद्धांच्या मागं लागून देशाचा नि त्यातील नागरिकांचे कोणत्याही स्वरूपात शोषण होणार नाही याची खबरदारी संविधानिक पदावर बसलेल्या पदाधिकाऱ्यानी घ्यावी असा संविधानातील या तरतुदीचा खरा अर्थ आहे ... पण आज देशात संविधानिक पदावर बसलेले किंवा बसवलेले पदधिकारीच अंधश्रद्धा पसरवण्यात नि वाढवण्यात आघाडीवर असतात ...त्यात संशोधक , वैज्ञानिक , लोकप्रतिनिधी ,मंत्री , प्रशासनातील अधिकारी , न्यायाधीश ,न्यायमूर्ती ,शिक्षक नि प्राध्यापक हे आघाडीवर असतील तर सर्व...