विवेकवादी डॉ. नरेंद्र दाभोळकर
#डॉनरेंद्रदाभोळकर यांच्या जयंतीनिमित्त,
त्यांना विनम्र अभिवादन
डॉ. नरेंद्र दाभोळकर हे सामाजिक कार्यकर्ते नि पुरोगामी विचारवंत ... पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक , परिवर्तनवादी , सामाजिक क्षेत्रातील ते अजातशत्रू ... आयुभर विज्ञानवाद ,विवेकवाद नि समतावादी विचारांचा केवळ आग्रह धरला नाही तर त्यासाठी सक्रिय काम केलं ... अंधश्रद्धा निर्मूलन हे त्यातीलच एक अग्रभागी असलेलं त्यांचं कार्य ... हेच त्यांचं जीवित कार्यही झालं होतं ...पण समाजातील श्रद्धांचा बाजार मांडून त्यावर पोळी भाजणाऱ्यांना हे खटकत होतं ... काहींना हा आपल्या धार्मिक कार्यातील अडथळा वाटु लागला ... लोकांच्या श्रद्धांच्या अडून सर्व प्रकारच्या शोषणाच्या आड दाभोळकर येतायत असं काहींना वाटतं होतं ...
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झालं होतं ... त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं होतं ... ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते... कबड्डीवर उपलब्ध असलेलं एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिलं आहे ... कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला होता...
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून १९७० मध्ये वैद्यकीय शाखेचं उच्च शिक्षण पूर्ण केलं होतं ... त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता ... डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या दहा भावंडांपैकी सर्वात धाकटे होते ... सुप्रसिद्ध समाजचिंतक डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते... बाबा आढाव यांच्या 'एक गाव - एक पाणवठा' या चळवळीत दाभोलकर यांनी सक्रिय सहभाग घेतला होता... त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ मध्ये स्थापन झालेल्या 'अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती' मध्ये कार्य सुरू केलं होतं ... १९८९ मध्ये श्याम मानव यांच्यापासून वेगळं होऊन त्यांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती' स्थापन केली होती ...
साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या #साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६ पासून आँगस्ट २०१३ पर्यंत संपादक होते ... महाराष्ट्र जादूटोणा विरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर यांनी अनेक वर्षे सतत प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी या संदर्भात सातत्यानं विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचं काम ते करीत होते. समाजातील भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते...
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे मॉर्निग वॉक करताना अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली ...
Comments
Post a Comment