हवामान खात्याचे उन्हाळ्यातील अंदाज
अलीकडे भारतीय हवामान खात्याचे उन्हाळ्यातील अंदाज खरे ठरत आहेत ... चार दिवसांपूर्वी मराठवाड्यातील चार अन विदर्भातील काही जिल्ह्यात बुधवारी म्हणजे 18 मार्च 2020 हवामान ढगाळ राहील ... पाऊसही पडेल असा अंदाज व्यक्त केला होता ...आणि तो शंभर टक्के खराही ठरला ...पावसाळ्यात असे अंदाज खरे ठरले तर किती बरं होईल असं एक मित्र म्हणाला ... पुढे तो मी सरकारी अधिकारीअसल्यानं खूप काही बोलला ... मी मात्र निमूटपणे त्याचे बोलणे ऐकून घेतले ... जणू काही त्याचे म्हणणे हवामानखत्यापर्यंतन मी पोहचावे असाच त्याचा अविर्भाव होता ... असो पण आज दिवसभर लातूरचे वातावरण ढगाळ राहिलं ...अचानक साडे पाचला गडगडाट ... जोराचा वारा सुटला ...त्यासोबत पावसाचे थेंबही आले ...अन त्यासोबत अर्धे लातूर शहर अंधारात गेले ...सायंकाळी पावणे सहा पासून औसा रोडच्या दोन्ही भागातील वीज गुल आहे ... कॅडलच्या प्रकाशात फेसबुकच्या वालवर ...वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहतोय ... वीज पुरवठा कधी सुरू होणार याचा अंदाज मात्र नाही ...आता एकट्यालाच कॅडल डिनर घ्यावे लागेल असे दिसतंय
Comments
Post a Comment