संविधानातील वैज्ञानिक दृष्टीकोन
जागतिक विज्ञान दिन :
संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोण कोणासाठी...?
आज 10 नोव्हेंबर अर्थात अनेक दिन विशेष असण्याबरोबर *जागतिक विज्ञान दिन* सुद्धा आहे ... भारतीय संविधानात वैज्ञानिक विचार अंगिकारण्याचा नि तो वाढीस नेण्याची जबाबदारी नागरिकांबरोबरच संविधानिक संस्थावर टाकली आहे ... भारतीय नागरिकांचा विवेक जागृत रहावा ... त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं विचार करावा ...अंधभक्तीनं कुठलीही गोष्ट स्वीकारु नये...
कोणतीही गोष्ट घडण्यामागं वैज्ञानिक कारणं असतात ...कारण कारक भाव असतो ...त्यामागची कारणं चिकित्सकपणे शोधण्याचा प्रयत्न करू नये ... अंध श्रद्धांच्या मागं लागून देशाचा नि त्यातील नागरिकांचे कोणत्याही स्वरूपात शोषण होणार नाही याची खबरदारी संविधानिक पदावर बसलेल्या पदाधिकाऱ्यानी घ्यावी असा संविधानातील या तरतुदीचा खरा अर्थ आहे ...
पण आज देशात संविधानिक पदावर बसलेले किंवा बसवलेले पदधिकारीच अंधश्रद्धा पसरवण्यात नि वाढवण्यात आघाडीवर असतात ...त्यात संशोधक , वैज्ञानिक , लोकप्रतिनिधी ,मंत्री , प्रशासनातील अधिकारी , न्यायाधीश ,न्यायमूर्ती ,शिक्षक नि प्राध्यापक हे आघाडीवर असतील तर सर्वसामान्य अशिक्षित नागरिक कुणाचे अनुकरण करतील ...? तर यांचेच ना ...?
पुज्यपाठ , धर्म विधी , धार्मिक कर्मकांड करणाऱ्या समाजातील माझे अनेक मित्र अशा अंधश्रद्धाआत्मक परंपरांचे पालन करत नाहीत तर जे असे कर्मकांड करतात त्यांना विचारलं तर सांगतात हे सगळं झूट आहे पण समाजासाठी हे सगळं करावं लागतं ... आम्हीलाही माहीत आहे की यात कोणतेही तथ्य नाही ... तर काही जण घरच्याच्या आग्रहास्तव हे सगळं करावं लागतं असं सांगतात , आपली धार्मिक परंपरा आहे म्हणून करतो असंही सांगणारे आहेत ...
करणं काही असोत पण यात वैज्ञानिक दृष्टीकोणापासून दूर जाण्याचाच विचार अधिक आहे ...त्यामुळं भारताचं नि भारतातील भावी पिढीचं मोठं नुकसान होणार आहे ...आम्ही आमच्या मुलांना असे संस्कार देतो की त्यांनी प्रश्न विचारू नयेत ...? असो , यावर सविस्तर लिहिणार आहेच ...
हा दिवस साजरा करण्यामागं विज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि उदयोन्मुख वैज्ञानिक समस्यांवर सार्वजनिक चर्चा व्हावी , हा महत्त्वाची उद्देश आहे ... या दिवशी नागरिकांना विज्ञानाबाबत माहिती देऊन विज्ञानाचे विकासातील महत्व , याविषयी माहिती दिल्याचे सुनिश्चित करण्याचा हा दिवस आहे... विज्ञानाविषयी दृष्टिकोन वाढवण्यासाठी वैज्ञानिक महत्वाची भूमिका बजावतात ती भूमिका लोकांसमोर आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो...
*" शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन साजरा केला जातो ... "
*" शांततापूर्ण आणि टिकाऊ समाजासाठी विज्ञानाच्या भूमिकेवर जनजागरूकता बळकट करणं ..."
* " देशांमधील सामायिक विज्ञानांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एकता वाढविनं..."
* '" समाजाच्या फायद्यासाठी विज्ञान वापरण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बांधिलकीचे नूतनीकरण करणं ... "
*" विज्ञानासमोर आलेल्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करणं आणि वैज्ञानिक प्रयत्नांना आधार देणं ..." हे या दिनाचे उद्देश आहेत ...
या दिनाची सुरुवात १९९९ मध्ये यूनेस्को आणि बुडापेस्ट मधील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विज्ञान संघटनेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित विज्ञान पाठोपाठ शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस तयार करण्यात आला ...
#यशवंत भंडारे ,
औरंगाबाद ,
दि .10 नोव्हेंबर 2022
*****
Comments
Post a Comment