अनुराधा पाटील यांची मानवतेच्या कळकळीची कविता - यशवंत भंडारे

औरंगाबादच्या अनुराधा पाटील यांच्या “ कदाचित अजूनही ” या काव्यसंग्राहाची साहित्य अकादमीनं पुरस्कारासाठी निवड केली आहे. अनुराधा पाटील यांच्या कविता चिंतनात्मक आहेत. स्त्रियांच्या भावना अन् जाणीवा त्या हळुवारपणे मांडतात. त्यांच्या कविता स्वत:ची वाट शोधताना दिसतात. त्यांची कविता स्त्रियांच्या जीवनातील दु:खाला, एकाकीपणाला, सोशिकतेला पर्याय शोधताना दिसते.अनुराधा पाटील यांचे 1981 ते 2005 या 24 वर्षांत चार कविता संग्रह प्रसिध्द झाले. त्या कविता संग्रहात 224 कवितांचा समावेश आहे.तर “ कदाचित अजूनही ” काव्यसंग्रहात 51 कविता आहेत. कवितांच्या क्षेत्रात त्यांनी स्वत:ची स्वतंत्र वाट शोधलीच त्याचबरोबर समकालीन मराठी कवितेच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रभाव निर्णय केला. त्यांची प्रतिभा संपन्नता त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. त्याच प्रतिभेचा साहित्य अकादमीनं 2019 चा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या वर्षीच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2013 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रकाशित करण्यात आलेल्या साहित्यकृतींचा विचार करण्यात आला. ताम्र पत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश ...