पुणे येथे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय


आताचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे हे पूर्वीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. १८५४ मध्ये १६ डिसेंबर रोजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाची, गिंडी ( १७९४) व आय. आय. टी , रुरकी ( १८४७) यांपाठोपाठ भारतातील तिसरे सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय मुळा आणि मुठा, या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना CoEPians असे म्हण्तात.
भारतीय उपखंडातील तांत्रिक गरजा भागवण्यासाठी १८५४ मध्ये इंग्रजांनी 'Poona Engineering Class and Mechanical School' या नावाने हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले होते. त्यावेळी भारतात इमारती, पूल, धरणं , कालवे, रेल्वेवे इत्यादी सार्वजनिक सोयींच्या बांधकामासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हेच या महाविद्यालयाचे प्रमुख कार्य होते. नंतर काही काळासाठी महाविद्यालयाचे नाव 'Poona Civil Engineering College' असे करण्यात आले होते. शेवटी १९११ मध्ये या महाविद्यालयाचे 'College of Engineering, Poona' असे नामकरण करन्यात आले .

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?