लातूर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आस्था व लेखा प्रशिक्षण



लातूर येथील विभागीय माहिती कार्यालयातर्फे विभातील लातूर ,उस्मानाबाद ,नांदेड आणि हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हा माहिती अधिकारी , कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या आस्था आणि लेखा विषयक दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षणाची आज सुरुवात झाली . प्रशिक्षणाच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे माहिती उपसंचालक यशवन्त भंडारे हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे आणि जिल्हा कोषागार अधिकारी राधकीसन राऊत उपस्थित होते . यावेळी व्यासपीठावर जिल्हा माहिती अधिकारी सर्वश्री सुनील सोनटक्के ( लातूर ) , अरुण सूर्यवंशी ( हिंगोली ) , मनोज सानप ( उस्मानाबाद ) , सहायक संचालक तथा नांदेडच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?