कृतिशील समाजसुधारक : गाडगे महाराज
गाडगे महाराज म्हटलं की हाती झाडू आणि सफाई असं चित्र डोळ्यासमोर येतं पण गाडगे महाराज यांनी जमिनीवरील सफाईबरोबरच माणसाच्या मनातील अंधश्रद्धा , कालबाह्य रूढी - परंपरा , चालीरीती , जातीभेद यांवर प्रहार करतानाच वैज्ञानिक दृष्टिकोनही समाजात रुजवण्याचा प्रयन्त केला ... त्यांची सवांद शैली श्रोत्यांच्या मनाला थेट साद घालणारी होती ...दैनंदिन व्यवहारातील वैगुण्यावर नेमकेपणानं बोट ठेऊन त्यातील खोटेपणा ते सहजपणे दाखवून देतं ...त्यामुळं त्यांचे अनेक भक्त झाले पण गाडगेबाबा आजच्या बजबजपुरीतील भोंदू बाबा सारखे नव्हते ... ते स्वतः चा बडेजावपणा वाढवून भक्तांना लुटणारे धर्माचा बाजार माडणाऱ्यापैकीही नव्हते ...उलट दगडातील देवा पेक्षा माणसातील देवाला अन देवळातील देवा पेक्षा चालत्याबोलत्या माणसाच्या कल्याणाचा ...त्याच्या सर्वांगीण विकासासाठी , त्याच्या सुखासाठी ,त्याच्या शिक्षण आणि आरोग्याससाठी काम करण्याचा आग्रह ते अधिक धरत असतं ...ते दरवर्षी पंढरपुरात आषाढी वारीला जात पण लोकांनी केलेली घाण साफ करत ...विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा त्यांनी स्वच्छतेत देव शिधला ...कुणास पाया पडू दिले नाही अन स्वःताला देवत्व मिळावे म्हणून तसे वर्तनही केले नाही ...उलट पाया पडणाऱ्यांच्या पाटीत खराटा हणून त्याला माणुसकीतील धर्म सांगितला ... स्वतःसाठी किंवा कुटूंबासाठी एकही गोष्ट केली नाही पण समाजाती गरिबांसाठी धर्मशाळा , गरीब समजतील मुलांसाठी शाळा , वसतिगृह बांधली ...अन आपल्या मृत्यपत्रात कुटूंबातील कुणाचाही त्या सगळ्या प्रॉपर्टीत काहीही संबंध असणार नाही असं स्पष्टपणे लिहून ठरवलं ... आज समाजासाठी म्हणून संस्था काढायच्या आणि आपल्या कुटूंबाच्या मालकीच्या करावयाच्या असा जणू नियमच झाला आहे ... गाडगेबाबा , कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची खूप घट्ट अशी तात्विक आणि वैचारिक मैत्री होती ... हे तिघेही एका समान धाग्यांन एकमेकांशी ऋणाबंध ठेऊन होते ते म्हणजे मानवतावाद , उपेक्षित घटकाबद्दल करुणा , सामाजिक परिवर्तनासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणे ...डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थानापणा , गाडगेबाबा यांनीही त्यांच्याप्रमाणे वसतिगृह आणि शाळा काढल्या तेही गरिबांसाठी ... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेचं नाव पीपल्स अर्थात रयत किंवा जनता तर भाऊराव पाटील यांनी तर आपल्या संस्थेच्या नावात रयत म्हणजे जनता असच नाव घेतलं ... बाबासाहेब आंबेडकरांनीही शाळा - महाविद्यालयाबरोबर वसतिगृह सुरू केली ...तसच काम गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं ... गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला ...तर त्यांचं निधन २० डिंसेंबर १९५६ रोजी झालं ... त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांच्या उच्चाटनासाठी तळमळीन कार्य केलं ... " तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा होत ... "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका... अशीच शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली... माणसात देव शोधणाऱ्या गाडगेबाबा यांनी लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, विद्यालये आणि वसतिगृह सुरू केली... रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ यांची सेवा म्हणजे देव ...असं त्याचं तत्वज्ञान होतं ... गोरगरीब आणि अनाथ अपंगामध्ये ते अधिक रमतअसतं ... डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे...त्याचं
१८९२ मध्ये लग्न झालं ... त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु आणि मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण त्यांनी त्या काळातील परंपरेला छेद दिला होता...परंतु त्याची ही कृती गावात कोणालाही आवडली नाही ...पण त्याची परवा त्यांनी केली नाही ...समाज सेवा हा त्यांचा मूळ पिंड असावा कारण गावत कुणी नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगेबाबा स्वतःहून पुढे येतं ... सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत असा विचार त्यांनी गावकऱ्यांत रुजवला...
गाडगेबाबा यांनी १ फेब्रुवारी, १९०५ रोजी घरादाराचा त्याग केला ... त्यानंतर त्यांनी तीर्थाटन करत अनेक ठिकाणीची भ्रमंती केली ... या भ्रमंतीत त्यांनी लोकसेवेला प्राधान्य दिलं ... कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला ते पुढे होतं ... मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जातं ...त्यासाठी त्यांनी कधी काही अपेक्षा बाळगली नाही हाच त्यांचा परिपाठ असायचा... ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे...अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटक गडाग असा त्यांचा वेष असे... त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले... ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत... सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलनची तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः कृतिशील जिवापाड प्रयत्न केले...
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा घालवण्यासाठी गाडगेबाबा यांनी आपले संबंध आयुष्य घालावंलं... यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमाचा चपलखपानं वापर केला ... कीर्तन करताना श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण आणि दोषांची जाणीव करून देतं असतं ... त्यांचे उपदेशही साधे, सोपे असतं ... चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद आणि अस्पृश्यता पाळू नका , असा उपदेश ते आपल्या कीर्तनातून करतं ... देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला... संत तुकाराम महाराजांना गुरू मानणाऱ्या गाडगेबाबा यांनी ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असंच सांगितलं ... आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा त्यातही त्यांच्या वऱ्हाडी बोलीचा खूप चांगला उपयोग करत असतं ... गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केलेला त्याचं साहित्य वाचताना दिसून येतो ... ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेऊ शकत असतं ...आपलं म्हणणं पटवून देतअसतं ... " गाडगेबाबा यांच्या कीर्तनाची शैली आणि सादरीकरण शब्दात उभं करणं माझ्याचान जमणार नाही , इतकं ते उत्कटतेन कीर्तन करत "असं मत बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं ...
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ आणि अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली... कुष्ठरोग्यांची सेवा केली... गाडगेबाबांच्या कार्यामूळ आदर्श समाज सेवेचा पायाचं महाराष्ट्रात रोवला गेला असं म्हटलं तर वावगं ठरू नये ...गाडगेबाबा यांच्याबद्दल आचार्य प्र .के.अत्रे यांनी खूप छान म्हटलंय , ते म्हणतात " महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड मोठं व्यासपीठ म्हणजे गाडगेबाबा होत " ...लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी त्यांचं निधन झालं ... " गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला " असं भजन करणारा आवाज आणतात विलीन झाला ...त्यांची समाधी अमरावती येथे आहे...
अमरावती विद्यापीठाला गाडगेबाबा यांचं नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं आहे... गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन ...!!!
Comments
Post a Comment