डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भाष्यकार प्रा अविनाश डोळस
प्रा. अविनाश डोळस सर यांचं घर म्हणजे अनेकांच्या मार्गदर्शनाच हक्काचं ठिकाण ... अनेक विषयांचं त्यांनी नेमकेपणानं केलेलं विश्लेषण समाधान करून जात असे... या गप्पांचा फड पूर्वी त्यांच्या छावणीतील घरी जमत असे नंतर सरांनी नंदनवन कॉलनीत बांगला बांधला अन गप्पांचा फड मग येथे रंगू लागला ...प्रा अविनाश डोळस यांचा आज जन्म दिवस ... 11 डिसेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबे येथे झाला ... प्रा. अविनाश डोळस यांनी जातीय, धार्मिक अभिनिवेश टोक गाठत असताना वंचित, वंचित , बहुजनांच्या हक्कांची जाणीव सवर्णामध्ये करून देणारी समन्वयवादी भूमिका घेत उपेक्षितांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांचा ठाव घेण्याचं काम सातत्यानं केलं ... डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची नितांत निष्ठा होती ... याच विचारांची सोबत करत उपेक्षितांच्या चळवळीला आकार देण्याचं काम ते करत असत ... सामाजिक चळवळीला डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांची विताकद देताना ती चळवळ कार्यप्रवण करण्यासाठी समविचारी चळवळीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कसे जात येईल या...