नवनिर्मितीकार : के .शिवराम कारंथ
यक्षगान कलाकार , थोर साहित्यिक काटा शिवराम कारंथ यांची आज पुण्यतिथी ... त्यांचा मृत्यू ९ डिसेम्बर १९९७ रोजी उडपी येथे झाला ...तर जन्म १० ऑक्टोबर १९०२ रोजी कोटा येथे झाला ...
कन्नड साहित्यिक ,परायावर्णवादी ,इतिहास प्रेमी ,नाटककार ,कादंबरीकार अशी ओळख असणारे शिवरामजी कर्नाटकातील बहुआयामी व्यक्तिमत्व होतं ... त्यांनी ४७ कादंबऱ्या ,३१ नाटकं लिहिली ... शिवराम कारंथ यांचं नाव केवळ कन्नडच नव्हे, तर भारतीय साहित्यातही अतिशय आदरानं घेतलं जातं... त्यांच्या निवडक पुस्तकांचा अनुवाद मराठीही झाला आहे... ‘चोमन दुडी’ या त्यांच्या कादंबरीचा ‘चोमा महार’ या नावान मराठी भाषेत अनुवाद कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे... हा अनुवाद श्यामलता काकडे यांनी केला आहे ...
कन्नड भाषेत कसदार साहित्यनिर्मिती करणारे साहित्यिक के. शिवराम कारंथ हे भारतीय साहित्यविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होतं ... ‘द व्हिस्परिंग अर्थ’ हा त्यांच्याच कादंबरीचा इंग्रजी अनुवाद मराठीत माणूस आणि माती या नावान करण्यात आला ... ही कादंबरी माणूस आणि माती यांच्यातील नातं अधोरेखित करते ... या कादंबरीत कर्नाटकातील एका शेतकऱ्याच्या तीन पिढ्यांची कहाणी सांगितली आहे ... त्याचबरोबर या कहाणीत कर्नाटकातील विशिष्ट काळच्या संस्कृतीची मांडणी कारंथ यांनी केली आहे.... माणूस ,पर्यावरण , कला आणि शिक्षण यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या के . शिवराम कारंथ यांना प्रत्यक्ष भेटण्याचा , त्यांच्याशी संवाद करण्याचा आणि त्यांचं भाषण ऐकण्याचा योग्य १९९३ मध्ये नाशिकमध्ये आला ... या ज्ञानयोगी नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या कर्मयोग्यास " विनम्र अभिवादन ...!!! "
.. ***यशवंत भंडारे , लातूर
दि .9 डिसेंबर 2019

Comments
Post a Comment