महात्मा फुले यांना : कोटी कोटी नमन ...!!!
आपला भारत हा देश मुख्यतः समाज, जाती, धर्म यावर आधारलेला आहे ... त्याच्या परिवर्तनाचा रस्ता दाखवण्यासाठी समाजसुधारकांनी खूप प्रयत्न केले ... भारतात सर्वाधिक समाजसुधारक महाराष्ट्रातील होते ... देशाला समाजसुधारणेची प्रेरणाच मुळात महाराष्ट्रातील समाज सुधारकांची आहे ... त्यांचा हा वारसा त्यांच्या ग्रंथांद्वारे आजही आपणास मार्गदर्शक ठरतो आहे ...
या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे अग्रगण्य आहेत ... ते खऱ्या अर्थानं क्रांतीसुर्य होतं ... त्यांची दुसरी ओळख मराठी भाषेतील लेखक , कवी , नाटककार , उद्योजक , शास्त्रज्ञ शेतकरी , विचारवंत , बांधकाम व्यावसायिक , शिक्षण तज्ज्ञ , स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे पाहिले नेते , स्पृश्यशाचे उद्धारक अश्या कितीतरी विशेषणांनी करून देता येईल ... " सत्यशोधक समाज " संस्थेची स्थापना करून त्यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली ... महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्व प्रथम स्त्री आणि अस्पृशांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली... जनतेने त्यांना मुंबईतील एका मोठ्या समारंभात महात्मा ही पदवी मोट्या सन्मानाने बहाल केली.... शेतकऱ्यांच्या परिस्थिचे , त्यांच्या समस्यांचे आणि त्या समस्यांचे उपाय सांगणारा "शेतकऱ्यांचे आसूड" हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता... या ग्रंथातील विचारांचे अनुकरण आजही शेतकऱ्यांनी केले तर त्यांची आजच्याही सर्व समस्यातून सुटका होऊ शकते ... इतका हा ग्रंथ महत्वपूर्ण आहे ... आज देशात आणि महाराष्ट्रात शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त आहे ... आत्महत्या करतो आहे... कर्जबाजारी झाला आहे ... निसर्ग साथ देत नाही आहे ...पण या समस्या आजच उद्भभवल्या नाहीत ज्योतिराव फुले याच्याही काळातही होत्या ... शेकऱ्याचे प्रश्न येथील व्यवस्थेत आहेत , असे त्यांनी त्याही काळात ठामपणे सांगितले ... क्रांतीबा ज्योतिराव या ग्रंथात म्हणाले होते , ते वाचा " धर्म आणि राज्यव्यवसंस्थेकडून होत असलेले शोषण म्हणजे आपल्या नाशीबाचाच एक भाग आहे , असे समजून शेतकरी वागत असल्यामुळे ते दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले आहेत... शेतकऱ्यांचे अज्ञान , त्यांचे अडाणीपण यामुळेही शेतकऱ्यांची पिळवणूक होत आली आहे ... शेतकऱ्यांनी आपले अज्ञान , आळस , धर्मभोळेपणा , व्यसनाधिता आणि गतानुगतिकतेचा त्याग केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही ..."
सूर्या परी सत्यप्रकाश पिरिता |
शांती सर्व देतो| चंद्र जैसा|
तोच खरा महात्मा म्हणावा...अशी त्यांची थोरवी आहे ... त्यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुन्हा एकदा कोटी कोटी वंदन... विनम्र अभिवादन ...!!!

यशवंत भंडारे , लातूर
दि . 28 नोव्हेंबर 2019
दि . 28 नोव्हेंबर 2019
Comments
Post a Comment