ग . त्र्यं . माडखोलकर यांना विनम्र अभिवादन .... !!!


मराठी साहित्यातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व ,लेखक ,कवी , पत्रकार आणि समीक्षक आशा विविध अंगी लेखनान मराठी भाषा समृद्ध करणारे गजानन त्र्यंबक माडखोलकर यांची आज पुण्यतिथी... प्रथम त्यांना अभिवादन ...!!!
आपल्या खास भाषा वैभवामुळे माडखोलकर मराठी जगतात परिचित होते ...मी महाविद्यालयात असताना त्याचं मिळेल तेव्हडे साहित्य वाचलं ... त्यांच्या लयदार , भरदार आणि प्रसंगाच चित्रण खास पद्धतीनं करण्याच्या शैलीमुळ ते त्यांच्या लेखनाच्या प्रेमात वाचकांना पाडत असतं ...मराठी आणि स्वस्कृत कविता करत - करत त्यांनी मराठी साहित्यात विविध साहित्य प्रकार हाताळले ... ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते ... रविकिरण मंडळाने १९२४ मध्ये प्रकाशित केलेल्या " उषा " या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविताही प्रकाशित झाल्या ... बेळगाव येथे १९४६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ... कर्नाटकातील या संमेलनात त्यांनी कर्नाटकीच्या नाकावर टिचून मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा असा प्रथमच ठराव मांडला आणि तो ठराव पास झाला... इटली आणि आर्यलँडच्या इतियाचा त्यांनी अभ्यास केला होता ... महाराष्ट्रातील काही दैनिकात सहसंपादक म्हणून काम केल्यानंतर ते नागपुरातील दै तरुण भारत मध्ये प्रमुख संपादक म्हणून स्थिर झाले ... मराठी पत्रकारितेतही त्यांनी मोलाची कामगिरी केली ...कादंबरी हा त्यांचा खास साहित्य प्रांत असावा करण त्यांच्या कादंबऱ्या वाचकांना प्रिय होत्या ... स्वातंत्र्य आंदोलनातही त्यांनी १९३० - १९४६ या कालखंडात सहभाग घेतला होता ...त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही ते सक्रिय होते ... दलित साहित्याच्या चळवळीकडे ते डोळसपणे पाहत असत ...त्यांच्या पत्रव्यहारातून तत्कालीन महाराष्ट्राच्या सामाजिक , राजकीय आणि सांस्कृतिक इतिहाची ओळख होते ...

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?