नांदेड येथील ज्येष्ठ संपादक डॉ रवींद्र रसाळ यांचे निधन
नांदेड येथील दै.गोदातीर समाचार चे माजी संपादक डाॅ.रविन्द्र रसाळ यांचे आज ( दि.8 डिसेंबर 2019 ) दुपारी तीन च्या सुमारास परभणी येथे ह्रदयविकाराने निधन झाले... ते पंच्याहात्तर वर्षांचे होते... नांदेड आणि मराठवाड्याच्या पत्रकारितेत दैनिक गोदातीर समाचार हे जुने आणि परिचित दैनिक... गोदातीर च्या स्थापनेपासून त्यांनी पत्रकारितेत आपले योगदान दिले... सायकलवर फिरून बातम्या गोळा करणे, वार्ताहरांची प्रशिक्षण शिबिरे घेणे, बातम्यांवर संपादकीय संस्कार करणे याबरोबरच बातमी, अग्रलेख, वितरण अशा सर्वच बाबतीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता... विशेष म्हणजे ते विज्ञानिक लेखनास प्राधान्य देत असत ... भूकंपावर त्यांनी संशोधन केलं होतं ... काश्मीर प्रश्नावर त्यांनी काही अग्रलेख लिहिले... मराठवाड्यातील पत्रकारिता, साहित्यिक पिढी घडविण्यात दै गोदतीरचा मोठा वाटा होता... माझ्या महाविद्यालयीन काळात लिहिल्या कविता , इतर लेखनास दै गोदतीर म्हणजे हक्काच व्यासपीठ होतं ... त्याकाळी दै प्रजावणी आणि दै गोदतीर म्हणजेच वृत्तपत्र असं काहीसं म्हटलं जातं असे ... दै मराठवाडा बिलोली , कुंडलवाडी ला दुसऱ्या दिवशी पोहोचत असे ... पण दै मराठवाडा वाचणं म्हणजे वैचारिक मेजवानी असे ... रविवारचा मराठवाडा आणखीनच वाचनीय असे ... तीच परिस्थिती थोड्या फार प्रमाणात गोदतीर , प्रजावाणी च्या रविवारच्या अंकाची असे ... मी नांदेड च्या यशवंत महाविद्यालयात शिकत असताना दै गोदतीर च्या शिवाजी नगरच्या कार्यालयात बातम्या , लेखन प्रसिद्ध करण्यास जात असे ...तेव्हा रवींद्र रसाळ यांची , कुसुमताई रसाळ , आमचे मित्र दत्ता डांगे ,माधव चिंतानकर यांची आवर्जून भेट होत असे ... त्या नंतर त्यांची सुमारे आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!!!

Comments
Post a Comment