डॉ नागनाथ कोत्तपल्ले परिवर्तनवादी लेखक

#डॉनागनाथकोत्तापल्ले : पुरोगामी , परिवर्तनवादी सामाजिक जाणिवेचे लेखक - समीक्षक यांना विनम्रपणे भावपूर्ण श्रद्धांजली... मराठी साहित्य नि सारस्वतात 1960 नंतरच्या काळातील महत्त्वाचे मराठी साहित्यिक. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणार्या प्रा डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचं आज पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दुपारी निधन झाल्याची बातमी मी आज बिलोली येथे असताना समाज माध्यमातून कळली ... तशी ही बातमी खरी नसवी मनोमन वाटत असल्यानं पुण्यातील साहित्यिक वर्तुळातील मित्रांना फोन करून कन्फर्म केलं असता ही बातमी खरी असल्याचं स्पष्ट झालं ... काल त्यांच्या चिरंजीवणी सरांची प्रकृती गंभीर असल्याचं साहितलं होतं पण सर खूप लढवय्या असल्यानं बाहेर येतील असंही वाटतं होतं पण ही आशा फोल ठरली... सरांचं महाविद्यालयीन शिक्षण नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे झालं होतं ... तर पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथील पूर्वीचं मराठवाडा विद्यापीठ नि आताचं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झालं होतं ... ...