संविधानानुसार आपल्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा ही हार्दिक शुभेच्छा ...!!!

आज राष्ट्रीय विज्ञान दिवस सर चंद्रशेखर व्यंकट रमण अर्थात सी .व्ही .रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी # RamanEfect चा शोध लावल्याबद्दल हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित करण्यात आला आहे ... यामागे मुख्य हेतू प्रत्येक भारतीयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हा आहे ... दर वर्षी त्या त्या वर्षासाठी एक थीम ( घोष वाक्य ) भारत सरकार जाहीर करतं ... यावर्षीची म्हणजे २०२० ची थीम " विज्ञानात महिला " ( Women in Science ) अशी आहे .रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी # RamanEffect चा शोध लावला आणि अगदी दिनच वर्षांनी म्हणजे १९३० मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला .विज्ञानातील संशोधनासाठी भारतातील संशोधकास मिळालेला हा पहिला नोबेल पुरस्कार होता . आपणा सर्वांना भारताचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात परंतु आपणास हे फारसं माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक म...