मुद्रण कला विचारांची वाहक
मुद्रण यंत्राचा शोध
लावणाऱ्या योहान गुटनबर्ग यांच्या जन्मदिनी २४ फेब्रुवारीला म्हणजे आज जागतिक
मुद्रण दिन साजरा केला जातो . मानवी इतिहासात मुद्रनाच्या शोधामुळे विचार
प्रसाराला गती मिळाली . म्हणून या दिसास इतिहासात खूप मोठे महत्व आहे .कालौघात
मुद्रण कलेतील शोधामुळं या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होत आहेत .आणि आणखी होत
राहतील ... मुद्रण अर्थात छपाईचा इतिहास १३०० ते १४०० वर्षे जुना आहे. चिनी
लोकांना छपाईची कला अवगत होती. चीन मध्ये दगड , लाकूड यावर कोरलेल्या मजकुरावर शाई
लावून त्याचा ठसा कागदावर घेतला जात असे. प्रामुख्यानं बुद्धाच्या विचारांची
माहिती त्यात असे .म्हणजे बौद्ध धर्मियांची मुद्रण कलेच्या वाढीत आणि विकासात
महत्वाची भूमिका होती . कागदावर ठसा उमटवरून एकाच मजकुराच्या किंवा चित्राच्या
अनेक प्रति तयार करणे याला मुद्रण (प्रिटिंग) म्हटले जाते. योहान गुटेनबर्ग यांनी
लावलेल्या शोधामुळे मुद्रणाची क्रांती झाली. छपाईसाठी टिकाऊ सुटी अक्षरे (मुव्हेबल
टाइप) मोठ्या संख्येने तयार करणे, तसेच प्रत्येक अक्षर एकसारखे दिसायला असणे
महत्त्वाचे होते. मोठ्या प्रमाणावर मुद्रण करण्यासाठी एका विशिष्ट यंत्राची गरज
होती. योहान गुटेनबर्ग यांनी या दोन्ही कल्पनांचे श्रेय दिले जाते. बायबल मुद्रित
करण्याचे श्रेयही त्यांना देण्यात येते. गुटेनबर्ग यांचा मूळ व्ययसाय चांदीच्या
कारागिराचा होता. गुटेनबर्ग यांनी लावलेला छापखान्याचा शोध मानवी जीवन आमूलाग्र
बदलणारा ठरला. साहित्य, पत्रकारिता यांचा प्रसार मुद्रणामुळे झाला.
भारतात मुद्राण
तंत्राचा वापर प्रथम १५५६ मध्ये सुरू झाला. पोर्तुगीजांनी गोव्यात एक छापखाना सुरू
केला. मुद्रण तंत्राचा प्रसार त्यानंतर देशातील इतर भागांमध्ये झाला. मुंबईत
मुद्रण प्रथम इंग्लंडमधून तयार करून आणलेल्या खिळ्यांच्या साह्याने केले जात होते.
मद्रास प्रांतांतही छपाईच्या तंत्राचा प्रसार झाला होता. अठराव्या शतकाच्या अखेरीस
मुंबई, मद्रास व कलकत्ता या शहरांत अनेक छापखाने सुरू झाले. मुद्रणाचा राज्यातील
इतिहास पाहिला, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक छापखाना उभारला होता. 'लिहिता
मंडप' असा त्याचा उल्लेख आढळतो. परंतु, तत्कालीन मराठी लिपीतील अचडणींमुळे त्यांना
तो चालू करणे शक्य झाले नसावे, असे अभ्यासकांचे मत आहे. शिवाजी महाराजांनी १६७४
मध्ये हा छापखाना गुजरातमधील भिमजी पारेख या व्यापाऱ्यास विकला होता. राज्यात १८१२
मध्ये अमेरिकन मिशनने मुंबई येथे छापखाना सुरू केला. सेरामपूर येथून देवनागरी
लिपीचे काही खिळेही मागवले. त्यावर पुस्तकांची छपाई सुरू करण्यात आले . अमेरिकेतील
युनिव्हर्सल टाइप मशिन या कंपनीच्या मागणीनुसार त्यांनी 'आयडियल टाइप कास्टर' हे
यंत्रही शोधले. १९२१मध्ये त्यांनी हे यंत्र विक्रीस आणले होते. साक्षरतेच्या
प्रसारासाठी मुद्रित पुस्तके उपयोगी ठरली. धर्मप्रसारासाठीही हा शोध महत्त्वाचा
ठरला.
जगभरात मुद्रणाची
अनेक तंत्रे सध्या उपलब्ध आहेत. प्रामुख्याने लिथोग्राफी (ऑफसेट), फ्लेक्सोग्राफी,
ग्रव्हिअर, स्क्रिन प्रिटिंग आणि डिजिटल अशा प्रकारांत मुद्रण व्यवसाय चालतो.
त्यापैकी व्यावसायिक ऑफसेट प्रिटिंगचा वाटा सर्वाधिक आहे. त्याखालोखाल डिजिटल
प्रिटिंग व्यवसायाचे क्षेत्रे येते. या क्षेत्रात प्रामुख्याने लहान व्यावयायिक
आहेत. तातडीने प्रिंट किंवा कॉपी करून देण्याची सेवा ते उपलब्ध करून देतात. कार्यालयासाठी
लागणारे छापील साहित्य पुरवण्याचा व्यवसायही महत्त्वाचा आहे. सध्या मुद्रण
क्षेत्राला टेलिकॉम, इंटरनेट, टेलिव्हिजन, ऑडिओ, व्हिडिओ कंटेट, सोशल मीडिया
यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, मुद्रण आपले महत्त्व टिकवून आहे. पुस्तके,
वर्तमानपत्रे, मासिके यापुरतेच छपाईचे क्षेत्र मर्यादित नाही. कापड, होर्डिंग,
उत्पादनांची वेष्टने, जाहिराती, फ्लेक्स अशा विविध वापरांसाठी मुद्रणाचा वापर होतो
आहे.
'छपाईसाठी वापरऱ्या
जाणाऱ्या ऑफसेट, फ्लेक्झो, डिजिटल प्रिटिंग आदी मशिनच्या प्रोसेस क्षमतेमध्येही
वाढ झाली आहे. छपाईचे कलर रिप्रोडक्शन अधिक चांगले कसे होईल याकडे लक्ष दिले जात
आहे. एखाद्या उत्पादनाच्या ब्रँडसाठी वापरलेला रंग त्याच्या होर्डिंगवर, पॅकिंगवर
एकसारखाच कसा दिसेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते आणि त्यासाठी आधुनिक
तंत्रज्ञान वापरले जाते. प्रिटिंगसाठीच्या सॉफ्टवेअर, हार्डवेअर सुविधा विकसित
झाल्या आहेत. पूर्वी छपाईतील कलर मॅचिंग हे आव्हान होते. तेही आता राहिले नाही .
मुद्रण मानवी जीवनाचा
अविभाज्य भाग झाले आहे. डिजिटल स्वरूपात मजकूर उपलब्ध होत असला, तरी पुस्तक,
वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्याचा आनंद निराळाच आहे. जाहिराती, होर्डिंग,
माहितीपत्रके माहितीपत्रके, कार्यालयीन साहित्य, पॅकेजिंग उद्योग यासारख्या अनेक
क्षेत्रात मुद्रण उपयोगी ठरत असून, त्याचा वापर यापुढेही सुरूच राहणार आहे. 'झिंक
इमेजिंग' या कंपनीने शाईशिवाय छपाईचे तंत्र विकसित केले आहे. या कंपनीकडे
१८०पेक्षा अधिक पेटंट आहेत. यामध्ये विशिष्ट तापमानाला रंग बदलणारा विशेष कागद
वापरला जातो. यातील थर्मल प्रिंटरमुळे मुद्रणाचा आयाम बदलणार आहे. सध्या थ्री डी
प्रिटिंगचाही बोलबाला आहे. मात्र, सध्या हे तंत्रज्ञान खर्चिक आहे. इलेक्ट्रॉनिक
डेटा देऊन प्रिंटरच्या माध्यमातून या प्रकारच्या मुद्रणात थ्री डी मॉडेल किंवा
वस्तू तयार करता येतात. थ्री डी प्रिटिंगचा प्रसार झाल्यास अनेक उद्योगांवर परिणाम
होण्याची शक्यताही वर्तवली जाते. मुद्रणाचा अक्षरांच्या खिळ्यांपासून ते थ्री डी
प्रिंटिंगपर्यंतचा हा प्रवास मानवजातीच्या इतिहासात अमीट ठसा उमटवणारा ठरला
आहे.मुद्रणयोजनेचा शोध : मुद्रा, मातृका व शिशाचा संयुक्त उपयोग करून टिकाऊ अशी
अक्षरे (सुटी) मोठ्या संख्येने तयार करणे व प्रत्येक अक्षर (एकाच अक्षराचे सर्व
नमुने) दिसायला सारखे असणे ही यूरोपमध्ये पुस्तके मुद्रित करण्याच्या दृष्टीने एक
मोठी गरज होती.
योहान गूनटेबेर्क
यांना वरील दोन्ही नवीन कल्पनांचे श्रेय दिले जाते पण त्यातही थोडी अनिश्चितता आहे
आणि या कल्पना प्रत्यक्षात आल्यानंतर लवकरच त्यांच्या श्रेयाबद्दल मतभेद उत्पन्न
होऊन त्याबद्दल वाद उत्पन्न झाला. गूटेनबेर्क यांनी मुद्रित केलेल्या कुठल्याही
पुस्तकावर किंवा इतर कागदांवर त्यांच्या नावाचा उल्लेख नाही, ही वस्तुस्थिती आहे.
४२ ओळींच्या बायबलसारख्या उत्कृष्ट कृतीवर त्यांचे नाव नाही पण इतर काही ग्रंथांवर
त्यांचे नाव असल्याने त्याचे श्रेय त्यांना मिळाले होते. काही ऐतिहासिक व तांत्रिक
संशोधनानंतर बायबल मुद्रित करण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले. गुटेनबेर्क यांचा
मूळ व्ययसाय चांदीच्या कारागिराचा होता. त्यांनी योहान फूस्ट यांच्याबरोबर
जर्मनीमध्ये माइनत्स येथे जो मुद्रणाचा व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू केला त्यामध्ये
त्यांनी फक्त अभिकल्पक (आराखडा तयार करणारा) भागीदार म्हणून काम केले. त्यामुळे या
पुस्तकावर त्यांचे नाव दिले गेले नाही. नंतर गूटेनबेर्क यांनी १४५५ मध्ये
त्यांच्या सहकाऱ्यांविरूद्ध खटला भरला आणि त्यात ते हरले. या खटल्याच्या
संदर्भातील काही कागपत्रांमधील उल्लेखांवरून त्यांनी बायबल छापण्याचे काम केले,
असे अनुमान काढले गेले आहे.
गूटेनबेर्क यांच्या
निधनानंतर बरीच कागदपत्रे प्रसिद्ध झाली व त्या सर्वावरून मुद्रणाच्या शोधाचे
श्रेय त्यांच्याकडे जाते. त्यांच्या विरूद्ध या शोधावर हक्क सांगणारे योहान शफर
(योहान फूस्ट यांचे नातू) यांनीच अप्रत्यक्षपणे गूटेनबेर्क यांच्या बाजूने ही
गोष्ट मान्य केली आहे. १५०९ नंतर योहान शफर यांनी चल अक्षरांचा व मुग्रणाचा शोध
फक्त त्यांच्या वडिलांनी (पेटर शफर यांनी) व आजोबांनी लावला होता असा हक्क
सांगायला सुरूवात केली पण त्याआधी १५०५ मध्ये एका पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये
१४५० मध्ये माइनत्स येथे गुटेनबेर्क यांनी चल अक्षरांचा व मुद्रणाचा शोध लावला असे
शफर यांनीच लिहिले होते. त्यांनी त्यांच्या आजोबांकडून याबाबत माहिती घेतली असली
पाहिजे, असे अनुमान आहे. त्यांचे आजोबा १४६६ मध्ये निधन पावले व वडील १५०२ मध्ये
निधन पावले. त्यानंतर १५०९ च्या सुमारास योहान शफर यांनी आपलेच शब्द फिरवून
गूटेनबेर्क यांचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचे कारण मात्र समजत
नाही.
सुरुवातीला
अक्षरांच्या खिळ्यांचे उत्पादन पुढे दिलेल्या पद्धतीने झाले असावे अशी समजूत आहे.
अक्षराचा ठसा प्रथम पितळी किंवा काशाच्या पृष्ठावर कोरला जातो. नंतर त्यावर शिशाचा
रस ओतून त्याची मातृका तयार करण्यात येते व त्याच्या साच्यात एक मिश्रधातू ओतून
त्यातून अक्षरे तयार करण्यात येतात. या खिळ्यांचे वर्णपटविज्ञानीय विश्र्लेषण
केल्यानंतर असे आढळले की, या जुन्या खिळ्यांच्या मिश्रधातूमध्ये शिसे, कथिल व
अँटिमनी यांचा उपयोग केला होता. सध्याही याच धातूंचा उपयोग केला जातो. शिशाचे
ऑकसिडईडन रूपांतर लवकर होऊ नये म्हणून त्यात कथिल मिसळले जाते. खिळे तयार करताना
शिशाच्या मातृकांवर हवेत परिणाम होवून त्या ठिसूळ होऊ नयेत म्हणूनही कथिलाचा त्यात
उपयेग केला जातो. शिसे व कथिल या दोनच धातूंच्या मिश्रणात टिकाऊपणा व कडकपणा येऊ
शकत नाही म्हणून अँटिमनी मिसळली जाते.
१४७५ च्या सुमाराला
अक्षरांच्या पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचली. त्याआधी नरम धातूच्या
मुद्रा वापरल्या जात. पेटर शफर यांनी पोलादी मुद्रा तयार करण्याची कल्पना सुचविली.
पोलादी मुद्रेवरुन तांब्याच्या मातृका तयार केल्यास त्यांच्या साह्याने तयार
केलेले आक्षरांचे खिळे जास्त एकसमान मिळतील या कल्पनेतून पोलादी मुदेरा तयार
करण्याची कल्पना सुचली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अक्षरांचे खिळे
सर्वासाधारणपणे वर दिलेल्या पद्धतीने तयार केले जात.
मृद्रणयोजनाकाराचे
काम साधारणपणे चार भागांत विभागलेले असते. एक अक्षरांचे खिळे त्यांच्या
कप्प्यांमधून एक एक काढून घेणे. दोन अक्षरजुळणीसाठी वापरली जाणारी पट्टी (स्टिक)
हातात धरून तीत अक्षरांच्या ओळी तयार करणे. ही पट्टी प्रथमतः लाकडाची व नंतर
धातूची वापरण्यात येऊ लागली. तीन शब्दांमधील अंतर व्यवस्थित करून ओळीची लांबी
पूर्ण करणे. त्यासाठी दोन शब्दांमध्ये शिशाच्या कोऱ्या (अक्षरविरहित) पट्ट्या
जरूरीप्रमाणे घालणे. चार मजकुरांचे मुद्रण पूर्ण झाल्यानंतर अक्षरांचे खिळे सुटे
करून अक्षरांच्या कप्प्यांत प्रत्येक अक्षर परत टाकणणे .
गूटेनबेर्क यांच्या
काळातील कागदपत्रे आणि १४३९ च्या सुमाराला झालेल्या एका खटल्यातील काही नोंदी
यांच्यामुळे सुरुवातीच्या काळापासून मुद्रणयंत्र वापरले जात होते, अशी माहिती
उपलब्ध आहे. कदाचित प्रथम पुस्तकबांधणीसाठी वापरले जाणारे दाबयंत्र थोडेसे सुधारून
त्याचा अपयोग पुस्तकाच्या मुद्रणासाठी केला गेला असावा. अक्षरांच्या खिळ्यांवर शाई
लावून त्यांवर कागद ठेवून मग त्यावर यांत्रिक पद्धतीने (लाकडी
मळसूत्राच्या-स्क्रूच्या साहाय्याने) दाब देणे ही सर्व क्रिया या दाबयंत्रामार्फत होत
असे. हे तंत्र पूर्वी लाकडी ठोकळ्यावरील अक्षरांवर दाब देऊन मुद्रण करण्याच्या
तंत्रापेक्षा जास्त चांगले होते, कारण यामुळे अक्षरांच्या कडा जास्त चांगले होते,
कारण यामुळे अक्षरांच्या कडा जास्त ठळक होत असे. तरीही या तंत्रात काही त्रुटी
होत्या. खिळ्यांवर शाई लावून नंतर त्यावर कागद ठेवणे हे फार त्रासदायक होत असे.
सर्व प्राथमिक गरजा भागवायला समर्थ झाले, अशी समजूत आहे. अक्षरांची जुळणी केलेली
सर्व पाने (मजकूर) एका हलत्या पाट्यावर ठेवून तो पाटा पुढे-मागे करण्याची यांत्रिक
सोय प्रथम अस्तित्वात आली. त्यामुळे मजकुरावर शाई रुळाच्या साह्याने लावून तो
मजकूर मागे सरकवून त्यावर कागद ठेवणे व नंतर त्यावर दाबून मुद्रण करणे इतक्या
क्रिया या यंत्रामध्ये होत असत. त्यानंतर काही यांत्रिक सुधारणा केल्यामुळे हेच
यंत्र वापरणे जास्त सुलभ झाले. एका फर्म्याचे दोन भाग करून दोन यांत्रिक हालचालींनी
तो फर्मा छापणे अशा पद्धतीने मुद्रणासाठी होत राहिला.
गेल्या ३५०
वर्षामध्ये मळसूत्राच्या मुद्रणयंत्रामध्ये अनेकविध सुधारणा झाल्या आणि त्यांतील
बहुतेक सर्व महत्त्वाच्या होत्या. १५५० च्या सुमाराला लाकडी मळसूत्राने घेतली.
त्यानंतर वीस वर्षांनी संशोधकांनी दुहेरी बिजागरीच्या साह्याने लोखंडी चौकट
हलविण्याची सोय, फत्त्क अक्षरांच्या खिळ्यांवर शाई लावून उरलेल्या भागावरील शाई
कागदावर उतरु नये म्हणून एक कातडी आवरण, दाब समान देण्यासाठी एक कापडी जाड थराची
गादी वगैरे सुधारण केल्या. साधारण १६२० च्या सुमाराला अँम्स्टरडॅम येथे यंत्राचा
पाटा आपोआप वर उचलला जावा म्हणून पाट्यावर दाबा देण्यासाठी जी एक पट्टी वापरली जात
असे त्या पट्टीला प्रतिभार लावण्याची(समतोल राखण्यासाठी दुसरे वजन लावण्याची) सोय
करण्यात आली. या यंत्राला ‘डच मुदणयंत्र’ असे नाव मिळाले व हेच यंत्र १६३८ मध्ये
उत्तर अमेरिकेमध्ये प्रचारात आणले गेले. या सुधारणेचे जनक व्हिलेम यान्सन ब्लाऊ हे
समजले जातात. १७९० च्या सुमाराला विल्यम निकलसन या इंग्रज वैज्ञानिकांनी आणि
संशोधकांनी खिळ्यांवर शाई लावण्यासाठी कातडी आवरणाचा एक रूळ तयार करून तो वापरायला
सुरुवात केली. यामुळे अशा यंत्रावर प्रथम चक्रीय गतीचा उपयोग केला गेला. कातडी
आवरणाच्या ऐवजी नंतर सरस आणि मोलॅसिस (उसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे
स्फटिक साध्या प्रक्रियांनी तयार करता येत नाहीत असा भाग) यांच्या मिश्रणाचा उपयोग
तयार करता येत नाहीत असा भाग) यांच्या मिश्रणाचा उपयोग रूळ करण्यासाठी करण्यात
आला.
आ. १. सोळाच्या
शतकातील मुद्रणालयातील विविध क्रियाः (डावीकडून उजवीकडे) मजकुरावरुन अक्षरांच्या
खिळ्यांची जुळवणी फर्म्यातील खिळ्यांची दुरुस्ती खिळ्यांवर शाई लावणे व मुद्रित
कागदांचे गठ्ठे लावणे दावयंत्राद्वारे दाव देणे. मुद्रित कागद वाळण्यासाठी
टांगलेले दिसत आहेत.
इंग्लंडमध्ये १७९५
मध्ये प्रथमतः धातूचा उपयोग केलेले मुद्रणयंत्र तयार करण्यात आले. नंतर काही
वर्षांनी अमेरिकेतील एका यंत्रज्ञाने एक धातूचे यंत्र तयार केले, त्यात मळसूत्राचा
उपयोग करण्याऐवजी सलग अशा धातूच्या यांत्रिक सांध्यांचा उपयोग केला होता. या
यंत्राचे नाव ‘कोलंबियन’ असे होते. त्याच्या नंतर सॅम्यूएल रस्ट यांनी ‘वॉशिंग्टन’
नावाचे यंत्र तयार केले. त्याचा ताशी वेग सु. २५० कागदांचा (प्रतींचा) होता. (
संदर्भ : मराठी विश्वकोश आणि विकिपीडिया )
यशवन्त भंडारे ,
लातूर
25 फेब्रुवारी 2020
25 फेब्रुवारी 2020
Comments
Post a Comment