मराठी ज्ञान भाषा व्हावी : यशवंत भंडारे
कुसुमाग्रज यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मला अनेक वेळा मिळाली .मी नाशिक येथील दै सकाळ मध्ये असताना सुटीच्या दिवशी कुसुमाग्रज यांच्या घरी जात असे .थोडावेळ चर्चा करून निरोप घेत असे . मराठवाडा आणि मराठवड्याडतील साहित्यिक , साहित्य ,सामाजिक चळवळी हा प्रामुख्यानं चर्चेचा विषय असे .तर कधी त्यांच्याकडून सकाळसाठी एखाद्या विषयावरची प्रतिक्रिया अशाही निमित्तानं त्यांची भेट घेतली होती .या भेटीत त्यांच्याकडून बरेचसे शिकावयास मिळाले .
लातूर येथील विभागीय माहिती कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय,श्री. महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, कवयीत्री सौ.शैलजा कारंडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, प्रा. राजाभाऊ होळकुंदे, प्रा. शिवप्रकाश डोंगरे ,जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.
भाषेची अवस्था वाईट नाही तर आपल्या अकलनाची अवस्था वाईट झाली आहे. भाषेचा जन्म 70 हजार वर्षातील आहे. खानाखुनातून माणूस भाषा शिकत गेला आहे. प्राण्यामध्ये आपापसात एकमेकांशी आवाजातून संवाद साधला जातो. हाव भावातून सवांद साधला गेला . कालांतरानं त्यातूनच भाषेचा विकास झाला. मराठी भाषेचे पांग फेडायचे असेल तर सर्वांनी मराठी भाषेत बोलले तर पाहिजेच त्याशिवाय मराठीत लेखन ,संशोधन करणं आवश्यक आहे .ती तंत्रज्ञानाची , विज्ञानाची आणि ज्ञान भाषा व्हावी .असे आवाहनही लातूरचे माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यावेळी केले.
मराठी भाषेमध्ये प्रचंड लिखान झाले आहे पण आपण आपल्या घरात मराठी भाषा बोलत नाहीत. वाचन अनेक जण करत नाहीत .प्रत्येकाच्या घरात पुस्तकासाठी कोपरा , असावा ,त्यात प्रामुख्याने मराठी ग्रंथ असावेत आणि ते ग्रंथ घरातील सर्वांनी वाचावयास हवेत . कोणत्याही भाषेत शिक्षण घ्या पण आपल्या मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला विसरु नका असे सांगून मराठी भाषाही टिकली पाहिजे, नाही तर ती टिकवलीच पाहिजे, असे अग्रही प्रतिपादनही श्री. भंडारे यांनी केले.
अभिव्यसक्ती किंवा सवांदाचे मध्यम म्हणजे भाषा होय .गेल्या दोन लाख वर्षात आताच्या भाषेचा आनेक टप्प्यात विकास झाला .आय सारख्या बोलक्या भाषेच्या निर्मितीच्या संदर्भात भाषा शास्त्र आणि अन्य मानव्यशास्त्रे यांनी आपल्या आधी सत्तर हजार वर्षे हा कालावधी स्वीकारला आहे ,असे सांगून यशवन्त भंडारे म्हणाले की, पहिली चाळीस हजार वर्षे तर मौखिक भाषेला वर्तमान काळ वाचकांच्या पलीकडे नेण्यासाठी घालवावी लागली .आजच्या भाषेला आकार देण्यासाठी मानवाला चाळीस हजार वर्षे खपावे लागले .शेवटी आपण जिला भाषा म्हणतो ती गेल्या तीस हजार वर्षात माणसाच्या ओठावर आणि लेखनात अली , असेही ते म्हणाले .
भाषा इतिहास तज्ज्ञांच्या मते साधारणतः दहा हजार वर्षांपूर्वी पासून जगभर बहुतांश भाषा नाहीशा होऊ लागल्या आहेत .साधारणतः दहा हजार वर्षापूर्वी भाषांची जी स्थिती झाली होती तशीच पुन्हा एकदा असपल्या काळात होत चालली आहे असे सांगून श्री .भंडारे म्हणाले सध्या जगभरात लहान मोठ्या मिळून सहा हजार भाषा बोलल्या जातात .पण गेल्या दोन दशकात बिविध भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी होत आहे .त्यास आपली मराठीही अपवाद नाही .सुमारे आठरा वर्षांपूर्वी युनेस्कोने " द वर्ल्ड लँग्वेजीस इन डेंजर " अशी यादी केली . त्यात शेकडो भाषा संपूर्णतः मरणासन्न कशा होत आहेत याच वर्णन केले आहे गेल्या तीन - चार दशकात जगातील दोन तृतियांश भाषा नष्ट होतील असंही भाकीत केलं गेलंय ,तेव्हा मराठी जगवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे , शासन आपलं काम करतय त्यास नागरिकांनीही सहकार्य केले तर मराठी भाषा समृद्ध होईल ,असेही श्री .भंडारे म्हणाले .
भाषा नष्ट होण्याची कारणे सांगून श्री .भंडारे म्हणाले , मराठी भाषेतील वाङमयाची प्रदीर्घ परंपरा आहे .लिखित वाड्यामयाबरोबरच लोक वाङमयाचीही परंपरा आहे . पण ही परंपरा या पुढे टिकवून ठवण्याची मोठी कसरत करावी लागेल , असे सांगून त्यांनी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओली सांगितल्या ..
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आजच्या स्पर्धेच्या युगात मराठी भाषेवर इतर भाषेचे सावट येऊ लागल्याने आपली मराठी मातृभाषा लुप्त होऊ लागली आहे. तेव्हा मराठी मातृभाषेची अस्मिता संवर्धनाची जबाबदारी सर्वानी जपायला हवी, असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांनी केले.
प्राचार्य डॉ. सिद्राम डोगरगे म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात आमची मातृभाषा मराठीवर इतर भाषेचे सावट येऊ लागल्याने मराठी भाषा फक्त लुप्त होऊ लागली आहे. यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन करुन मराठी भाषेची अस्मिता स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन मराठी भाषेमधील तत्वज्ञान सर्वांनी घ्यावे असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. सिद्राम डोगरगे म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात आमची मातृभाषा मराठीवर इतर भाषेचे सावट येऊ लागल्याने मराठी भाषा फक्त लुप्त होऊ लागली आहे. यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन करुन मराठी भाषेची अस्मिता स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन करुन मराठी भाषेमधील तत्वज्ञान सर्वांनी घ्यावे असे आवाहन केले.
कवयीत्री सौ. शैलजा कारंडे म्हणाल्या की, वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची आभाळा ऐवढी उंची आहे. लिखान हे मरत नाही प्रत्येकाने लिखान करावे तसेच प्रत्येक वेळी छाती ठोकपणे बोलले पाहिजे. कोणत्याही भाषेला बारमाही दिवस नाहीत. कुणब्याच्या लेकरांनी आपण मस्तीत जगा व आपल्या मराठी मातृभाषेवर प्रेम करा असे संदेश देऊन सर्वांना क्षणभरासाठी का होईना माझी माय…. ही कवीता सादर करुन सर्वांना प्रोत्साहीत केले.
यावेळी बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी स्व:हस्तअक्षरात लिहलेल्या अस्मिता भिंतीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यावेळी बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी स्व:हस्तअक्षरात लिहलेल्या अस्मिता भिंतीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
या महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिंनीना जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हा वार्षिेक योजना सन 2019-20 विशेष घटक योजना अंतर्गत् प्रस्तूत केलेल्या दिनदर्शिंका, भित्तीपत्रीके, घडीपत्रिकांचे यावेळी वितरण करण्यात आले. तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकराज्य मासीकाच्या मराठी भाषा विशेषांक मान्यवर व विद्यार्थ्यांना भेट स्वरुपात देण्यात आला.
यावेळी मराठी भाषेतील काव्यवाचन व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्तावित बसवेश्वर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी ,विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
दि .२७ फेब्रुवारी २०२०
Comments
Post a Comment