फ्लॉवर ऑफ व्हॅली
ही छायाचित्र काश्मीर किंवा विदेशातील नाहीत ...ही छायाचित्र औरंगाबाद येथील बौद्ध लेणी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आहेत ... दोन महिन्यांपूर्वी हा परिसर हिरवाईनं नटलेला हिता ... आता त्यानं आशा गच्च फुलांचं रुपडं धारण केलय ... सकाळी मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी एव्हीनिंग वॉक साठी या परिसरात येणाऱ्यासाठी तर हे खास ठिकाण झालंय ... हे औरंगाबाद शहरातील ऑक्सीजन हब आहे असं म्हटल्यास हरकत नाही ... त्यात येथील लेण्याही मोहात पडणाऱ्या आहेत ...गोगाबाबा टेकडी आणि लेणीच्या वरची टेकडी आता ट्रेकरनाही खुणावत आहे ... तरुण , तरुणी , पुरुष - महिला , मुलं - मुली असे अनेक जण शनिवारी आणि रविवारी या टेकड्यावर मोठया प्रमाणात चढाई करताना दिसतात ... पूर्वी पर्यटक फारशी या लेण्यांना भेट देत नसतं हल्ली त्यांची संख्या वाढते आहे ... त्यामुळं लेणी परिसरात खाद्य पदार्थही मिळू लागले आहेत ... मग एकदा तुम्हीही भेट द्याच ... अतुल्य भारत ...!!!
Comments
Post a Comment