बुद्धीवंत महाराजांना विनम्र प्रणाम .... जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....


थोर संघटक , कष्टाळू , पराक्रमी , युद्धशास्त्र निपुण , शीलवान , विनयशील , महान मुत्सद्दी , कुळवाडी भूषण ,
शेतकऱ्यांचा कैवारी , किर्तीवंत , बुद्धिवंत अशा कितीतरी विशेषणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गैरव केला
तरी हे शब्द अपुरे आहेत ....  त्यांच्या कर्तृत्वाचा गैरव जगातील अनेक महान इतिहासकार... युद्धतज्ञ ...
विचारवंतांनी विविध अंगी स्ववरूपात केलं आहे....त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र प्रणाम ...
त्यापैकी काहींची नोंद मी येथे देत आहे...
1) इंग्रज इतिहासकार ऑर्म ...."   सेनानायक या नात्याने त्यांनी आपल्या सैन्याच्या अग्रभागी राहून जितकी भूमी
पायाखाली घेतली तितकी तितकी कोणत्याही सेनानायकाने केव्हाही घेतली नाही ... कोणत्याही संकटात मग ते कितीही भयंकर आणि अचानक आलेले असो ... त्यांनी आपले धैर्य यत्किंचितही ढळू दिले नाही ... अशावेळी मनामध्ये तात्काळ अचूक निर्णय घेऊन संकटाचा बिनदिक्कत सामना केला ... त्यांचे सर्वश्रष्ट अधिकारीही त्यांच्या सर्वगुणसंपन्नते पुढं
माना तुकवीत ...छातीचा कोट करून उघड उघड साहस
करण्यात त्यांच्या तलवारीवर मात करणारी तलवार आलम दुनियेत आढळली नाही ... त्यांचे खाजगी जीवन साधे होते ... त्यांच्या चालचर्येत औदत्य नव्हते ... नि राजा या नात्याने ते दयाळू होते ." ...

2 ) पो. व्हाईसराय... "  शिवजी राजे हे कष्टाळू 
      आणि पराक्रमी राजे   होते ."                                                                           

3 )  जे. टॉल बॉईस व्हीलर .." अधिराज्य साधन्याची
 बुद्धीमत्ता शिवाजी यांच्या ठाई जन्मजात होती ."

4 ) Mratha History चे लेखक किकेंड ..."  थोर संघटनकर्ता आणि युद्ध शास्त्रांत अत्यंत बुद्धिमान , असे तर ते ( शिवाजी  महाराज ) होतेच...परंतु दूरदर्शीपणाच्या मुत्सद्देगिरीत मात्र ते सर्वांहून श्रेष्ठ
होते ...एका पाठीमागून एक असे एकसारखे विजय
त्यांना मिळत गेले ... असे असतानाही त्यांनी जो विनय दाखवला त्या विनयासारखे  विनयाचे दुसरे उदाहरण जगाच्या इतिहासात सापडत नाही... प्राचीन आणि अर्वाचीन अशा दोन्ही काळात ज्या फाजील
 औद्धत्यपूर्ण अहंतेने कित्येक सेनानायकांचा नाश
  घडवून आणला ... त्या अहंतेला त्यांनी आपल्या बुद्धीचा तोल कधीही ढळू दिला नाही ... अशा गोष्टींना शिवाजी महाराजांच्या मनोमंदिरात कधीही थारा मिळाला नाही ... विजापूरकर आणि मोगल यांच्यावर त्यांनी विजयावर विजय संपादन केले ... परंतु त्यांचा उन्माद
त्यांनी कधी केला नाही ... आपल्या देशबांधवांना
 स्वातंत्र्य मिळून देणे हीच त्यांची महत्वाकांक्षा होती..."

5 ) मि. डेल्लन (  6 जानेवारी 1670 ) ...  "  शिवाजी महाराजांची प्रजा मूर्तिपूजक असली तरी ते सर्व धर्माना नांदू देतात ... या भागातील अत्यंत धोरणी आणि राजकारणी पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे  ..."

6 )  स्वामी विवेकानंद ..." भारताची ओळख जगाला विविध अंगांची आहेच ... पण भारताची समतोल
 ओळख जगाला सांगायची झाल्यास शिवरायांचे तत्व आणि तत्वज्ञान सामाजिक ...धार्मिक ...राजकीय ... शेतकरी ... आर्थिक ...परराष्ट्र धोरण यातील विचार
आणि आचार हीच नव्या भारताची ओळख होऊ
शकते..."

7 )  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ...
"  छत्रपती शिवाजींचे सकाळी स्मरण करावे !
   शूद्राती -- शूद्रांचा  प्रभू वंदू मनोभावे  ...   !! "

8 ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ... "  छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि चरित्र उत्तम होते .. भारतीय राज्यघटना लिहिताना मी शिवरायांच्या स्वराज्याला प्रमाण मानले ..."

9 )  जे स्कॉट ( J . Scott ) ..."  शिवाजी राजे एक योद्धा म्हणून असामान्य होते ... राज्यकर्ते म्हणून
निपूण होते ... तर सद्गुणी लोकांचे मित्र होते ...
त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली ... तर दृढतेने
ती  आमलात आणली ... कोणीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाबद्दल अवगत असे ..."

10 )   जीन -- दी -- तेवनो ..."  शिवाजींचे डोळे अतिशय
     तीक्षण आणि विलक्षण तेजस्वी आहेत ... त्यांची बुद्धिमत्ता त्यातून व्यक्त होते ... ते दिवसातून एकच
वेळा   सामान्यतः भोजन घेत असत ... तरीही त्यांचं आरोग्य उत्कृष्ट आहे ...."
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....
             ....   यशवन्त भंडारे , औरंगाबाद --लातूर

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?