प्रेमळ आई -मानी स्त्री : भिमाई
भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई आणि सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील धर्मा मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत आणि नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार मेजर होते. भीमाबाई सकपाळ (आंबेडकर) यांचं टोपणनाव भीमाई होतं . त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १८ ५४ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेभे येथे झाला , तर त्यांचा मृत्यू १८९६ मध्ये झाला . १८६७ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला. १८६६ मध्ये रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते आणि ते इंग्रजी सैन्यात सुभेदार मेजर या पदावर होते.
रामजी आणि भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, आणि तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव आणि भीमराव ही तीन मुलगे जिवंत होती. भीमराव सर्वात लहान आणि चौदावे अपत्य होता.[रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते . या काळात रामजी आणि भीमाबाईंच्या पोटी भीमा चा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला. बाळाचे नाव ' भीमा ' ' असे ठेवण्यात आले . घरात मात्र त्या ' भिवा ' असे म्हटले जात असे . तसेच त्यांची भीम आणि भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील 'कॅम्प दापोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. १९९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली आणि सातारा येथे राहिले. या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. १८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.
Comments
Post a Comment