अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांतील नायक

अण्णाभाऊ साठे यांची आज ९५ वी जयंती आहे. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठ काम केलं आहे. अण्णाभाऊ यांनी तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ साठे यांनी १९४२ मध्ये ‘वारणेच्या खोऱ्यात’ ही पहिली कादंबरी लिहून आपल्या कादंबरी लेखनाची जोरकस सुरवात केली. पुढे ते सातत्याने लिहित राहिले. अण्णाभाऊ जातीय, वर्गीय, हितसंबंधाच्या पूर्णतः विरोधात होते. त्यांनी बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुता या विचारधारेवर आधारित आपला वाड़मयीन दृष्टीकोन विकसित केला. समाजातील अन्याय, शोषण, विषमता, उच-निचता, उपेक्षितांची पिळवणूक, स्त्रियांची केली जाणारी पिळवणूक या आणि समक्ष विषयांचा आपल्या लेखनातून सातत्याने विरोध केला. एकीकडे समाजवादी, कम्युनिस्ट विचारांची कास धरत दुसऱ्या बाजूने महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर ठेऊन दलित शोषितांची प्रश्न जगाच्या समोर आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांचा विचार करताना त्या मनोरंजनाबरोबरच समाजचं वास्तवही प्रखरपणे मांडतातच त्याचबरोब...