महिला - मुलांना सुरक्षितेसाठी कायद्याचे सुरक्षा कवच : भंडारे
लातूर,दि.3:-महिला आणि मुलांना सुरक्षित रहाता यावे , त्यांना निर्भेळपणे सर्वत्र वावरता यावे , आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रामुख्याने डिजिटल तंत्रज्ञान , सायबर सुरक्षा त्यांना मिळावी ,त्यांचे कोणत्याही स्वरूपात शोषण होऊ नये आदी कारणासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध कायदे केले आहेत .त्यामुळे महिला आणि मुलांना कायद्याचे सुरक्षा कवचच प्राप्त झाले आहे ,असे प्रतिसाद येथील विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी आज येथे केल. जिल्हा पोलिस दल, कॉक्सीट कॉलेज व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विदयामाने कॉक्सीट कॉलेजमध्ये आयोजित “सायबर सेफ वूमन” बाबतच्या कार्यशाळेत श्री . भंडारे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर विक्रांत गोजमगुंडे, रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.एम.आर. पाटील,विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक यशवंत भंडारे, बाल विकास समितीच्या अध्यक्ष उमा व्यास, कॉक्सीटचे प्राचार्य नि...