विकास सबनीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...!!!


तब्बल पन्नास वर्षे व्यगंचित्रकलेची अव्याहतपणे सेवा करत त्यांनी राजकीय व्यंग हेच आपली शैली म्हणून विकसित केली ... राजकीय व्यंग अचूकपणे हेरून कुंचल्याचे चौफेर फटकारे मारणारे ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं कल रात्री दहाच्या सुमारास मुंबईत अल्पशा आजाराने निधन झालं ... ते ६९ वर्षांचे होते...
विकास सबनीस गेला आठवडाभर रुग्णालयात उपचार घेत होते.... अधिक तपासणीसाठी त्यांना माहीम येथील रुग्णालयात नेण्यात आले होतं ... मात्र तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं ... त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले ...
सबनीस यांच्या व्यंगचित्र कारकीर्दीला यंदाच ५० वर्षे पूर्ण झाली होती... त्यानिमित्त २० फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथील सावरकर सभागृहात आयोजित 'रेषा विकासची, भाषा ५० वर्षांची' या विशेष कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला होता... १९६८ पासून अव्याहतपणे त्यांनी व्यंगचित्रकलेची साधना केली... टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर. के. लक्ष्मण यांची आणि मार्मिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे पाहून ते प्रभावित झाले... बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांमागचा राजकीय विचार आणि त्यामागील विचारशक्ती पाहून आकर्षित झाल्याने त्यांनी राजकीय व्यंगचित्रकार होण्याचा निर्णय घेतला होता...
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनानं कलाक्षेत्राचा मार्गदर्शक हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे... या क्षणाला ठाकरे कुटुंबातील एक सदस्य कायमचा दूर गेल्याचे दु:ख मनात आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ...

Comments

Popular posts from this blog

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?

मूकनायक’ म्हणजे आंबेडकरी पत्रकारितेची सुरुवात

य.दि फडके : वैचारिक लेखनाचे वारसदार