पीडित महिलेची ओळख माध्यमांनी उघड करू नये : यशवंत भंडारे
लातूर दि 31 : प्रसार माध्यमे ही समाजाचा आरसा असून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी लेखनीचा वापर करावा, त्यांना संरक्षण मिळेल अशी भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती उमा व्यास यांनी केले.
येथील विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकारांसाठी महिला सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे होते. यावेळी विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, सहायक संचालक मीरा ढास हे होते.
यावेळी श्रीमती व्यास म्हणाल्या, महिला सुरक्षा हा चिंतेबरोबरच चिंतनाचाही विषय झाला आहे. महिलांच्या कायद्याची जाणीवजागृती देण्याचे काम माध्यमातून होणे गरजेचे आहे. महिलांकडे वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अत्याचार झाल्यानंतर महिला समाजात बदनामी होऊ नये म्हणून तक्रार देण्याचे टाळतात. अशा अनेक घटनाना राजकीय रंग दिला जातो. त्यामुळे पिडित महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने बदलला पाहिजे. समाजाची उदासीनता, निष्क्रीयता यामुळे कायद्याची म्हणावे तशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही . याबाबत माध्यमातून लेखन झाले पाहिजे. महिला व मुलीबरोबरच पुरुष वर्गांचेही संस्कार घेतले पाहिजेत. मुलींला जशी आई वयात आल्यानंतर लैंगिक शिक्षण देते तसेच मुलांना लैगिकतेचे शिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. मुलांमध्ये संवाद ठेवला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महिला सुरक्षित राहतील असे त्या म्हणाल्या.

माहिती उपसंचालक श्री.यशंवत भंडारे यांनी माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी नैतिक जबाबदारी समजून महिलांची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करावे. खप वाढवणे आणि समाज बिघडवणे यासाठी लेखन करु नये. महिलांविषयी सकारात्मक दृष्टीने विचार करुन त्यांनी केलेल्या कामाचे कौतूक केले पाहिजे. समाजामध्ये महिलांची उंची वाढविण्याचे काम करणे गरजेचे आहे. असे केल्यानेच त्यांचा कर्तृत्वाला वाव मिळू शकेल, असेही ते म्हणाले .
माध्यमांमध्ये महिलांचे म्हणावे तेवढे प्रमाण दिसून येत नाही. ते वाढले पाहिजे. सध्या ईलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आकाशवाणीच्या माध्यमातून महिला पुढे येत आहे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. माध्यमामध्ये महिलांकडून काम करुन घेण्यासाठी बंधने पडतात. मुलांना बालवाडीपासूनच वर्ण भेद, लिंग भेद या अनुषंगाने मार्गदर्शन झाले पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. यामुळे भविष्यात महिलावरील अत्याचार कमी होण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून प्रचंड मोठा व्यापार निर्माण झाला आहे. मोबाईलवर येणाऱ्या फेसबुक, व्हॉटसअपच्या माध्यमातून येणाऱ्या क्ल्पि अन्य माध्यमातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. 34 टक्के लोक इच्छा नसतानाही पोर्नसदृष्य माहिती मोबाईलवर पाहतात. मुलीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी होत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. माध्यमात काम करणाऱ्यांनी अत्याचार ग्रस्त किंवा पिडित महिलेचे , बालकाचे नाव, तिचा पत्ता, आई-वडिलांची संबंधित माहिती, पिडितांचे छायाचित्र वापरु नये. अत्याचार झालेल्या घटनेचे वर्णन अवास्तव स्वरुपात करु नये, असेही श्री. भंडारे यांनी स्पष्ट केले.
सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी महिला सुरक्षा चिंतेचा विषय झालेला आहे. महिला सुरक्षा ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. महिलांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागातर्फे दामिनी पथक, महिला तक्रारण निवारण केंद्र आणि अशा विविध सुविधेबाबतची माहिती दिली. तसेच सध्या वेब हायटेक झाले आहे. त्यामुळे कोणत्याही बाबीचा पासवर्ड मोबाईल नंबर, जन्म दिनांक असे ठेवू नये. आपला मोबाईलवर आलेला ओटीपी सांगू नये . फेसबूक, व्हॉटसअप ही माध्यमे सुरक्षित नाहीत. त्यामुळे महत्वाची माहिती पोस्ट करु नये, असे सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी माध्यमातून जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून कार्यशाळा आयोजनामागची भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखापालअशोक माळगे यांनी केले, तर सहायक संचालक श्रीमती ढास यांनी आभार मानले. या कार्यक्रमास पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा आयोजनासाठी चंद्रकांत कारभारी, दिलीप वाठोरे, अहेमद बेग, अशोक बोर्डे, श्रीमती मनीषा कुरुलकर यांनी परिश्रम घेतले.
*****

Comments
Post a Comment