ग . त्र्यं . माडखोलकर यांना विनम्र अभिवादन .... !!!

मराठी साहित्यातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व ,लेखक ,कवी , पत्रकार आणि समीक्षक आशा विविध अंगी लेखनान मराठी भाषा समृद्ध करणारे गजानन त्र्यंबक माडखोलकर यांची आज पुण्यतिथी... प्रथम त्यांना अभिवादन ...!!! आपल्या खास भाषा वैभवामुळे माडखोलकर मराठी जगतात परिचित होते ...मी महाविद्यालयात असताना त्याचं मिळेल तेव्हडे साहित्य वाचलं ... त्यांच्या लयदार , भरदार आणि प्रसंगाच चित्रण खास पद्धतीनं करण्याच्या शैलीमुळ ते त्यांच्या लेखनाच्या प्रे मात वाचकांना पाडत असतं ...मराठी आणि स्वस्कृत कविता करत - करत त्यांनी मराठी साहित्यात विविध साहित्य प्रकार हाताळले ... ते रविकिरण मंडळाचे सदस्य होते ... रविकिरण मंडळाने १९२४ मध्ये प्रकाशित केलेल्या " उषा " या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविताही प्रकाशित झाल्या ... बेळगाव येथे १९४६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ... कर्नाटकातील या संमेलनात त्यांनी कर्नाटकीच्या नाकावर टिचून मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा असा प्रथमच ठराव मांडला आणि तो ठराव पास झाला... इटली आणि आर्यलँडच्या इतियाचा त्यांनी अभ्यास केला ...