भारतरत्न जे आर डी यांना अभिवादन....!!!
भारतीय उद्योग जगातील संसमर्णीय व्यक्तिमत्व ... सामाजिक बांधिलकी आणि दाततृत्वाची जाण अन भान असलेले उद्योगपती ... याची झलक त्यांनी निर्माण केलेल्या संस्थातून व्यक्त होत ...ते म्हणजे टाटा समाज विज्ञान संस्था ...टाटा मूलभूत संशोधन संस्था ...आणि आशियातील पहिलें कर्करोग रुग्णालय याची त्यांनी केलेली स्थापना ...त्यांनी मानवतेच्या सेवेची मंदिर बांधली पण अंधश्रद्धेच्या नादी लावणारी नाही...त्यांनी सातत्यानं भारतीतील नागरिकांच्या गरजांचा , त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधांचा विचार केला ...ज्या देशात सुई निर्माण होत नव्हती त्या देशातील नागरिकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी 1945 मध्ये टेल्को ची सुरुवात केली ... टेल्को हे जेआरडी याचं अभियांत्रिकी सेवेच्या माध्यमातून नावं तंत्रज्ञान , नवं निर्मिती अन भारताच्या स्वप्न पूर्ततेसाठी उचललेलं पाऊलं होतं ... सर्व वस्तू आणि सेवा भारतीयांना भारतातच उत्पादित करून त्यांचा पुरवठा करण्याचे त्यांनी प्रयत्न केले ...त्यामुळे आज आपण अनेक बाबीत स्वयंपूर्ण होत आहोत ... भारतात विमान सेवा , लोह उद्योग , हॉटेल , मोटार गाड्या ते दररोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तूंचे उत्पादन आणि सेवांची सुरुवात करून त्यांनी टाटा उद्योग समूहाला खास सेवाभावी चेहरा दिला ... त्यांच्या भारताच्या विकासातील , सेवेतील आणि भारताच्या उत्थानासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना प्रथम 1957 मध्ये पद्मविभूषण तर 1992 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरावण्यात आलं आहे ...या भारतरत्न चा जन्म 29 जुलै 1904 रोजी झाला तर त्याचं निधन 29 नोव्हेंबर 1993 रोजी झाले ...आज त्यांची पुण्यतीथी ...त्यांना विनम्र अभिवादन ...!!!
*** यशवंत भंडारे , लातूर
दि .29 नोव्हेंबर 2019
*** यशवंत भंडारे , लातूर
दि .29 नोव्हेंबर 2019
Comments
Post a Comment