लोकशाही , समतेचे कट्टर पुरस्कर्ते .... महात्माबसवेश्वर

लोकशाही , समतेचे कट्टर पुरस्कर्ते 'महात्माबसवेश्वर ' महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक होते... त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध आणि अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध बंड पुकारून त्या समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला... त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला... शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५ मध्ये अक्षय तृतीयला प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला... काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा... त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते... त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते... त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या... बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज आणि बहिणीचे नाव नागम्मा होते ... बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत... त्यांनी वयाच्...