अनागरिक धर्मपाल यांना विनम्र अभिवादन...!!!


    अनागरिक धर्मपाल  यांचा आज 91 वा स्मृति दिन ... 



                              बौद्धिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेल्या वर्षी म्हणजे 1891 मध्ये 20 जानेवारी रोजी सारनाथला  धर्मपाल यांनी भेट दिली... त्यांची ही  भारतातील  बौद्ध स्थळांना भेट देण्याची पहिली वेळ होती... त्यापूर्वी त्यांनी एकदा  भरतात भेट दिली होती पण तेव्हा त्यांनी बौद्ध स्थळांना भेट दिली नव्हती... 22 जानेवारी 1891 रोजी त्यांनी बुद्धगयेस भेट दिली... त्यावेळी ज्या स्थानावर तथागतास बुद्धत्व प्राप्त केले,  जे जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी अतिशय जिव्हाळ्याचे ठिकाण आहे तेथील बुद्ध  विहारावर शैव धर्मियांचे स्वामित्व आणि बौद्ध धम्माच्या विरुद्ध असलेली पूजापाठ पाहून त्यांचे हृदय खेद,  चिंता, उद्वेग आणि दुःखाने व्यग्र झाले.... महाबोधी महा विहाराची दयनीय अवस्था झाली होती... बोधी वृक्षांचीही  अत्यंत वाईट अवस्था झाली होती... गेल्या फेब्रुवारी 2025 पासून  बुद्धगया येथे जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे  त्याची खरी सुरुवात धर्मपाल यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माच्या पूर्वी साडेतीन महिने अगोदर म्हणजे 22 जानेवारी 1891 रोजी सुरु केली  त्यास 134 वर्ष  झाली अलीकडेच आपन बाबासाहेबांची 134 वी जयंती साजरी केली...धर्मपाल यांनीच श्रीलंकेमध्ये बुद्ध धम्माला पुनरूज्जीवीत केले... बुद्धांचा आजचा धम्म

 ध्वज निर्माण करण्याचे श्रेय ही त्यांनाच जाते... स्वामी  विवेकानंदांना शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत बोलण्याची संधी ही धर्मपाल यांच्याचमुळे मिळू शकली... कारण धर्मपाल यांनीच संयोजनास विनन्ती करून त्यांना बोलण्यास परवानगी तर मिळवलीच त्याच बरोबर त्यांना देण्यात आलेल्या वेळेतील  काही मिनिटे विवेकानंदांना धर्मपाल यांनी दिली... 17 सप्टेंबर 1864 रोजी  श्रीलंकेत जन्म झालेल्या धर्मपाल यांनी बुद्ध धर्माचे काम करत भरतातच सारनाथ येथे 29 एप्रिल 1933 रोजी अखेरचा श्वास घेतला...त्यांना पुन्हा  एकदा विनम्र अभिवादन...!!!


     यशवंत कि. भंडारे

    दि.29 एप्रिल 2025


                                *

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?