...अन् पोलिओ झाला भारतातून हद्दपार !
जागतिक आरोग्य संघटनेनं भारतास पोलिओमुक्त घोषित केलं आहे. भारतानं मिळविलेलं हे फार मोठं यश आहे. उद्या दि. 18 जानेवारी 2015 रोजी पोलिओ डोस पाजण्याचा दिवस आहे. महाराष्ट्रातील 84 हजार 387 पोलिओ बुथवर पोलिओ पाजण्याची सोय करण्यात आली आहे. एक कोटी 34 लाख बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. पोलिओच्या विषाणूला भारतातून हद्दपार करायचं , असा निर्धार भारतानं 1995 मध्ये केला आणि हा निर्धार खऱ्या अर्थानं यशस्वी ठरला 28 ऑगस्ट 2014 रोजी. दरवर्षी हजारो बालकांना अपंगत्वाच्या बेडीत अडकवणाऱ्या पोलिओला त्याच्या मुळासकट हद्दपार करुन थांबायचे नाही तर सतत जागल्याचा पहारा देत त्याला डोकं वर काढूच द्यावयाचे नाही , असा निर्धारच भारतानं केलाय. ' होय आम्ही करुन दाखवणारचं !' असा निर्धार केलेल्या भारतानं सतत 19 वर्षे पोलिओच्या विषाणूला अतिशय सुक्ष्म नियोजन आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात पोलिओ ...