Posts

Showing posts from April, 2025

लोकशाही , समतेचे कट्टर पुरस्कर्ते .... महात्माबसवेश्वर

Image
 लोकशाही , समतेचे  कट्टर पुरस्कर्ते  'महात्माबसवेश्वर ' महात्मा बसवेश्वर महाराज  हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक  होते... त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध आणि अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध बंड पुकारून त्या समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला... त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला...  शालिवाहन शके दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात ११०५  मध्ये अक्षय तृतीयला प्रतिष्ठित वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला... काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा...  त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते...   त्यांचे वडील मणिराज ऊर्फ भादरस हे बागेवाडी आगाराचे भांडारप्रमुख होते...  त्यांच्या पत्नी मादुलांबा (मादंबा) परम शिवभक्त होत्या... बसवेश्वरांच्या भावाचे नाव देवराज आणि बहिणीचे नाव नागम्मा होते ...  बसवेश्वर कर्मठ विधींना विरोध करत...  त्यांनी वयाच्...

अनागरिक धर्मपाल यांना विनम्र अभिवादन...!!!

Image
     अनागरिक धर्मपाल  यांचा आज 91 वा स्मृति दिन ...                                बौद्धिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेल्या वर्षी म्हणजे 1891 मध्ये 20 जानेवारी रोजी सारनाथला  धर्मपाल यांनी भेट दिली... त्यांची ही  भारतातील  बौद्ध स्थळांना भेट देण्याची पहिली वेळ होती... त्यापूर्वी त्यांनी एकदा  भरतात भेट दिली होती पण तेव्हा त्यांनी बौद्ध स्थळांना भेट दिली नव्हती... 22 जानेवारी 1891 रोजी त्यांनी बुद्धगयेस भेट दिली... त्यावेळी ज्या स्थानावर तथागतास बुद्धत्व प्राप्त केले,  जे जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी अतिशय जिव्हाळ्याचे ठिकाण आहे तेथील बुद्ध  विहारावर शैव धर्मियांचे स्वामित्व आणि बौद्ध धम्माच्या विरुद्ध असलेली पूजापाठ पाहून त्यांचे हृदय खेद,  चिंता, उद्वेग आणि दुःखाने व्यग्र झाले.... महाबोधी महा विहाराची दयनीय अवस्था झाली होती... बोधी वृक्षांचीही  अत्यंत वाईट अवस्था झाली होती... गेल्या फेब्रुवारी 2025 पासून  बुद्धगया येथे जे महाबोधी मह...

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

Image
   जयंतीनिमित्त   संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट                  --- यशवंत कि.  भंडारे   सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव.... त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही... मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं आहे... गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनीच ...गझलेच्या सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला...‘लाभले आम्हास भाग्य’  या त्यांच्या गझलनं मराठी माणसाच्या  मनात खास जागा निर्माण केलीय..,       त्यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी...  गझल यांचा आयुष्यभर मनापासून अध्ययन केलं ... गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला...त्यामुळं मराठी भाषिकांचे ते खरे खुरे ‘गझल सम्राट’  झाले ... विदर्भातील अमरावती  शहरात सुरेश भटांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी झाला... तिथेच ते लहानाचे मोठे झाले... वडील डॉक्टर असल्यान  घरची आर्थिक परिस्थीती चांगली  होती...  आईला कवितेची खूप आवड होती... यातूनच सुरेश भट कवितेकड...

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

Image
बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध  - यशवंत भंडारे                          हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य समाज हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मियांकडून नाडला गेला होता. सबंध देशात ब्रिटिश कालावधीत समाज सुधारणेचे वारे वाहत असताना हैदराबाद संस्थानात मात्र समाज सुधारणेची थोडी झुळूकही येत नव्हती. छोटे छोटे प्रयत्न होत होते. पण ते सबंध हैदराबाद संस्थानात नव्हते. बाबासाहेबांनी या प्रदेशातील जातवास्तव अनुभवल्यानंतर त्यांनी हैदराबाद संस्थानासह मराठवाड्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेद्वारे त्यांनी मराठवाड्याला लळा लावला. दोन परिषदा घेऊन सर्वार्थानं संपूर्ण परिवर्तनाला चालना दिली. त्याचा वेध घेणारा हा लेख बाबासाहेबांच्या जयंतीमिनित्त देत आहोत...   आधुनिक महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण महात्मा जोतिराव फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक, कृतिशील कार्यातून व बांधिलकीतून झाली. सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळीनं आधुनिक महाराष्ट्रामध्ये सामाजिक, धार्मिक ...