रेडिओ दिवसानिमित
आजच्या रेडिओ दिवसानिमित अनेकांनी वाचनीय ... आठवणीय ... उडजबोधक ... प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत ... परंतु त्यात रेडीओची श्रवणीयता येऊ शकली नाही ...अन ते शक्यही नाही ... आजच्या समाज माध्यमात हे शक्य आहे तरीही ... भारतीय आकाशवाणीच्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतरच्या माझ्यासारख्या रेडिओची आठवण आकाशवाणीच्या सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी लागणाऱ्या खास आवाजपासून अनेकविध कार्यक्रमाची श्रवणीय मेजवणी आजच्या केवळ गीतंमय , संगीतंमय झालेल्या अन रेडिओ जॉकीच्या खास शैलीतील संवादाच्या यु गातही ... " हमारे जमाणेका रेडिओ कुछ खास था ..." असच म्हणावे लागते ... औरंगाबाद , मुंबई आणि दिल्ली आकाशवाणीच्या मराठी बातम्या म्हणजे राष्ट्रीय संवादाचा पूल होता ... माहिती , खबरबात नि राज्यापासून ,राष्ष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांची एकत्रित मेजवणी होती ... मी लहान असताना अनेक लग्नात नवरदेव रेडिओसाठी रुसल्याचे पाहिले आहे ... अनेक ठिकाणी हुंड्यातील अति महत्वाच्या मागणीत रेडिओ हमखास असे ... त्यानंतर रँडो कंपनीच घड्याळ असे ... घड्याळतील वेळ समजत नसेलतरी हाताला घड्याळ ...हातात रेडिओ आणि निघाला गाई , बैला ...