रेडिओ दिवसानिमित
आजच्या रेडिओ दिवसानिमित अनेकांनी वाचनीय ... आठवणीय ... उडजबोधक ... प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत ... परंतु त्यात रेडीओची श्रवणीयता येऊ शकली नाही ...अन ते शक्यही नाही ... आजच्या समाज माध्यमात हे शक्य आहे तरीही ... भारतीय आकाशवाणीच्या माध्यमातून स्वातंत्र्यानंतरच्या माझ्यासारख्या रेडिओची आठवण आकाशवाणीच्या सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी लागणाऱ्या खास आवाजपासून अनेकविध कार्यक्रमाची श्रवणीय मेजवणी आजच्या केवळ गीतंमय , संगीतंमय झालेल्या अन रेडिओ जॉकीच्या खास शैलीतील संवादाच्या युगातही ... " हमारे जमाणेका रेडिओ कुछ खास था ..." असच म्हणावे लागते ... औरंगाबाद , मुंबई आणि दिल्ली आकाशवाणीच्या मराठी बातम्या म्हणजे राष्ट्रीय संवादाचा पूल होता ... माहिती , खबरबात नि राज्यापासून ,राष्ष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांची एकत्रित मेजवणी होती ... मी लहान असताना अनेक लग्नात नवरदेव रेडिओसाठी रुसल्याचे पाहिले आहे ... अनेक ठिकाणी हुंड्यातील अति महत्वाच्या मागणीत रेडिओ हमखास असे ... त्यानंतर रँडो कंपनीच घड्याळ असे ... घड्याळतील वेळ समजत नसेलतरी हाताला घड्याळ ...हातात रेडिओ आणि निघाला गाई , बैला मग ...धुऱ्यावर रेडिओ ठेऊन शेतात राबणारे तरुण मी खूप पाहिलेत ...अलीकडील " " रेडू " चित्रपट पाहताना माझ्या रेडिओशी संबंधित खूप आठवणी जाग्या झाल्या ... झाल्या गावातील एका मित्राकडे रेडिओ होता ... तो त्याच्या सतत सोबत असे ...बिनाका गीत माला पासून भुले बिसरे गीत ते क्रिकेट , इंदीरा गांधी हत्ये नंतरचे समालोचन ...एव्हढेच काय माझं पहिलं वहिलं लेखन शाळेत असताना बाल सभा की बाल जगत या कार्यक्रमात प्रक्षेपित झालं ... मार्शल मॅकलुहन या मध्यम तज्ञान प्रत्येक माध्यमाची खास शक्ती स्थान असतात असं म्हटलं आहे त्यामुळं रेडिओचं शक्ती स्थान त्यावरील कार्यक्रम श्रावण करताना श्रोत्यांच्या कल्पनेस पंख फुटतात ... विषयानुरूप श्रोता मनानं त्यातील संवादाशी एकरूप होतो ...माझं मध्यमाबाबत पाहिलं प्रेम वृत्तपत्र असलं तरी दुसरं प्रेम रेडिओवरच आहे ...

Comments
Post a Comment