भारताची कोकिळा कवयित्री सरोजिनी नायडु
भारताची कोकिळा सरोजीनी नायडु यांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपले महत्वपूर्ण योगदान दिलेल्या महिलांपैकी त्या एक होतं .
सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या त्याशिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्याही होत्या. त्यांचे भाषण ऐकून अनेक दिग्गज व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन जात असतं . त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला राहिल्या. त्यांनी उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल म्हणून काम केलं , त्या राज्यपाल म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना भारताची नाइटिंगेल अर्थात भारताची कोकिळा देखील म्हंटल्या जात होतं. त्यांच्या कवितांमधे लहान मुलांच्या, निसर्गाच्या, देशभक्तीच्या, प्रेमाच्या आणि मृत्युच्या कवितांचा समावेश आहे . प्रामुख्यानं लहान मुलांच्या कविता करण्याकरीता त्या प्रसिध्द होत्या. त्यांच्या कविता वाचून अनेक जण आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रममाण होत असतं . त्यांच्या कवितांमधे खोडकरपणा , हळुवार भावना आढळून येतात .तर त्यांच्या काही कवितांमध्ये त्यांच्या लहानपणाचं चित्रण पहावयास मिळतं . म्हणुनच त्यांना ’भारताची कोकिळा’ म्हंटले जात होते.
भारतीय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथे एका बंगाली कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते ते वैज्ञानिक, शिक्षाशास्त्री , डॉक्टर आणि शिक्षक होते . हैद्राबाद येथील निज़ाम कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती. पुढे त्यांच्या वडिलांना प्राचार्य पदावरून काढून टाकण्यात आले . त्यानंतर ते तेव्हाच्या काँग्रेसचे बनले आणि आपली नौकरी सोडुन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती.
त्यांच्या आईचं नाव वरद सुंदरी देवी असं होतं . त्या बंगाली भाषेत कविता करीत असतं . सरोजिनी नायडुंना एकुण आठ बहिण - भाऊ होते . त्यांच्यात सरोजिनी या सर्वात मोठया होत्या. त्यांचा एक भाऊ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारी होता . त्याने बर्लिन कमेटीत आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती. त्याला 1937 मध्ये एका इंग्रजानं हत्या केली . सरोजिनींचे दुसरे बंधु हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय एक प्रसिध्द कवि, कथाकार, आणि कलाकार होते . या व्यतिरीक्त ते नाटकंही लिहीत असतं . त्यांची बहिण सुनालिनी देवी या एक उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री होत्या.
बालपणापासुन सरोजिनी या एक हुशार विद्यार्थिनी होत्या . त्यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, बांग्ला आणि फारसी भाषेचं चांगलं ज्ञान होतं . वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या . या परीक्षेत त्यांनी मद्रास प्रेसीडेंसीत प्रथम स्थान मिळवीलं होतं . सरोजिनीने गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं अशी त्यांच्या वडिलांची ईच्छा होती परंतु सरोजिनी यांना लहानपणापासून कविता लिहिण्याचा छंद जोपासला होता. कविता लिहिण्याचे गुण त्यांच्या आईकडून घेतले .
बालपणी त्यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहिली होती असं सांगितलं जातं . त्यांच्या कविता बरोबर त्याचं इतर लेखनही प्रत्येकाला प्रभावित करीत असे . त्यांच्या कवितेनं हैदराबादचे निजामही प्रभावित झाले होते . आणि त्यामुळं त्यांनी सरोजिनींना विदेशातील शिक्षणासाठी
शिष्यवृत्ती देखील दिली होती. वयाच्या सोळाव्या त्या शिक्षणासाठी वर्षी इंग्लंडला गेल्या . तेव्हां त्यांनी प्रथम किंग्स काॅलेज लंडन येथे प्रवेश घेतला.
पुढे कैम्ब्रिजच्या ग्रिटन कॉलेजमध्ये शिक्षण केलं . त्या काळातील इंग्रजीतील प्रसिध्द कवि आर्थन साइमन आणि इडमंड गोसे यांची त्यांनी भेट घेतली . त्यांनी सरोजिनींना भारतिय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यास आणि डेक्कन (दक्षिण पठार) ची भारतीय कवयित्री होण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर सरोजिनी नायडुंना यांनी भारतातील पर्वत, नद्या, मंदिरे आणि सामाजिक विषयांना आपल्या कवितांचे विषय केले . पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवियत्री झाल्या . त्यांच्या कवितांमुळे त्यांनी लाखो हृदयांमध्ये स्थान निर्माण केलं . इंग्लंड येथे शिक्षण घेत असताना त्यांची भेट गोविंद राजुलू नायडूंशी झाली . काही भेटीनंतर त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्या वेळी इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. सरोजिनी यांनी इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीनं वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी 1898 मध्ये त्यांचा गोविंद नायडूंशी विवाह केला.हा विवाह ब्राम्हो मॅरेज अॅक्ट अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला. त्यांचा विवाह हा आंतरजातिय होता . त्याकाळी वेगवेगळया जातींमध्ये लग्न होणं हे एखाद्या गुन्हयापेक्षा कमी समजलं जात नव्हतं कारण त्यावेळी आंतर जातीय विवाहांना भारतीय समाजात मान्यता मिळाली नव्हती.ते एक क्रांतिकारी पाऊल होतं . याकरता त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता . परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता आपल्या निर्भय आणि सुशिक्षीत अश्या सरोजिनीला तिच्या निर्णयात पूर्णपणे मदत केले. या सर्व विपरीत परिस्थीतीही त्यांचं वैवाहीक जीवन यशस्व झालं . विवाहापश्चात त्या चार मुलांच्या आई झाल्या .जयसुर्या, पद्मजा, रणधीर आणि लीलामणी अशी त्यांच्या चार अपत्यांची नावं होतं .
सरोजिनींची कन्या पद्मजा त्यांच्यासारखीच कवियित्री झाली . शिवाय ती सक्रीय राजकारणात उतरली आणि 1961 मध्ये पश्चिम बंगाल ची राज्यपाल झाल्या .
सामान्य महिलांपेक्षा सरोजिनी अगदी भिन्न होत्या . त्यांच्यात कायम काहितरी करण्याची उर्जा आणि उमेद होती . त्यामुळे विवाहानंतरही त्यांनी लिखाण सुरू ठेवलं . त्यांच्या कवितांच्या प्रशंसकांमध्ये देखील हळूहळू वाढ होत गेली . लोकप्रियताही वाढत गेला . सरोजिनींच्या प्रशंसकांच्या यादीत जवाहरलाल नेहरू, रविन्द्रनाथ टागौर यासारख्या महान व्यक्तींचा समावेश होता .
गोपाळ कृष्ण गोखले यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखलेंनी सरोजीनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला दिला.
गोपाळ कृष्ण गोखलेंनी सरोजिनींना आपली बुध्दी आणि शिक्षण पुर्णपणे देशाला समर्पित करण्यास सुचविले.1905 मध्ये बंगालच्या विभाजनावेळी सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधे सहभागी झाल्या होत्या. पण विभाजनामुळं त्या खूप व्यथीत झाल्या . आणि त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्या एक निष्ठावान देशभक्ता प्रमाणे सतत प्रयत्नं करत होत्या. सामान्य जनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत चेतवण्याकरीता संपूर्ण भारत त्यांनी पिंजुन काढला आणि लोकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लावण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं .
सरोजिनी नायडुंनी मुख्यतः महिलांमध्ये क्रांतीकारी विचार पेरण्याचं काम केलं . त्यावेळेसच्या काळात महिलांनी स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कैद करून घेतले होते. त्या काळात महिलांची स्थिती फार मागासलेली होती. अश्या काळात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेणं तर दुर स्त्रियांना घराबाहेर पाऊल ठेवण्याचीदेखील परवानगी नव्हती. 1916 मध्ये जेव्हां त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. सरोजिनी गांधीजींना आपला आदर्श मानू लागल्या, गांधीजींपासून प्रेरणा घेत त्यांनी आपली पुर्ण ताकत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात लावली.
त्यांनी मोंटगु-चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत आंदोलन, साबरमती संधी सत्याग्रह आणि नागरिक अवज्ञा आंदोलना सारख्या विविध आंदोलनांचं समर्थन केलं . त्याचबरोबर सविनय कायदेभंग आंदोलनात भाग घेतल्यानं त्या गांधीजींसमवेत कारागृहात शिक्षा भोगावी लागली . 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना 21 महिने कारागृहात राहावं लागलं होतं . या दरम्यान त्यांना अनेक यातनाही सहन कराव्या लागल्या होत्या. तरीही त्यांनी स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान कित्येक दिवस त्या जेलमध्ये काढले आणि एका सच्च्या देशभक्ताची कर्तव्य पार पाडली .
सरोजिनी नायडूंचे स्वातंत्र्याच्या लढाईतील योगदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव सामान्य जनतेवर पडला होता . त्या दरम्यान त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली होती. त्यांच्या विचारांनी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू अत्यंत प्रभावित झाले होते.
त्यांचे कर्तृत्व पाहुन 1925 मध्ये त्यांची काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली . पुढे 1932 मध्ये भारताच्या प्रतिनिधी या नात्यानं त्या दक्षिण अफ्रिकेतही गेल्या होत्या.
एवढेच नव्हें तर त्यांनी गांधीवादी सिध्दांताचा प्रसार करण्याकरता केवळ युरोपातच नव्हे तर संयुक्त राज्य अमेरीकेपर्यंतची यात्रा केली . महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या सरोजिनी नायडूंना 2 मार्च 1949 रोजी कार्यालयात काम करत असतांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.अश्या तऱ्हेने आपलं संपूर्ण आयुष्य सरोजिनींनी देशाला समर्पित केलं.
ईतकेच नव्हे तर त्यांच्या सुरेख कविता आणि गीतांमुळे त्यांना भारताची कोकिळा (भारताची नाइटिंगल) म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं . 1905 मध्ये त्यांच्या कवितांचा संग्रह “गोल्डन थ्रेसहोल्ड” नावाने प्रकाशित झाला . त्यांनतर त्यांनी आपले अन्य दोन संग्रह “दी बर्ड ऑफ टाईम” आणि “दी ब्रोकन विंग्स” देखील प्रकाशित केले . या कवितांना केवळ भारतातील लोकांनीच पसंती दिली असे नव्हें तर या पुस्तकांना इंग्लंड मधे देखील मोठया संख्येने वाचकांनी पसंत केले आणि या मुळेच त्यांना एक शक्तीशाली लेखीका म्हणून ओळख मिळाली.
प्रख्यात कवियित्री सरोजिनींनी कवितां व्यतिरीक्त काही लाख आणि निबंधांचेही
लिखाण केलं होतं . याच संबंधित “वर्ड्स ऑफ़ फ्रीडम” हा त्यांचा राजकीय विचारांवर आधारीत ग्रंथ प्रकाशित झाला आहे . या शिवाय त्यांनी महिला सशक्तिकरणासारख्या सामाजिक विषयास आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून वाचा फोडली होती. त्यांचा आशा लेखनाचा समाजावर खोलवर परिणाम झाला. द फेदर ऑफ द डॉन ला त्यांची कन्या पद्मजाने 1961 मध्ये संपादित करून प्रकाशित केलं होतं . त्यांचे इतर साहित्य “दी बर्ड ऑफ़ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ़ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ़ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ़ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ़ यूथ, दी मैजिक ट्री एंड दी विज़ार्ड मास्क देखील खूप चर्चित आणि प्रसिध्द आहेत. या व्यतिरीक्त त्यांच्या काही कवितांमधील सुंदर आणि लयबध्द शब्दांमुळे त्या कवितांना काळसापेक्ष आहेत .

Comments
Post a Comment