स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात बाबासाहेब आंबेडकर यांचं अनमोल योगदान
महापरिनिर्वाण दिनानिमत्त स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात बाबासाहेब आंबेडकर यांचं अनमोल योगदान - यशवंत भंडारे, लातूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. त्यांनी केवळ अस्पृश्यांसाठी कार्य केले, हा काही लोकांनी त्यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठी राबवलेला अजंडा आहे. भारताचा सर्वांगिण विकास त्यांच्या सामाजिक विकासांच्या मागील मूळ हेतू आहे. जोपर्यंत देशात सामाजिक विकासाचे चक्र गतीमान होणार नाही, तोपर्यंत देश विकसित होणार नाही. देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला गतीमान करणारे साधन आहे. त्याचा वापर केला गेला पाहिजे. मानवी साधन सामग्रीचा वापर सुयोग्य पध्दतीने करावयाचा असेल तर जात आणि धर्माच्या साखळ दंडानी जखडून ठेवलेल्या मानवी साधन सामग्रीला मुक्त केले पाहिजे, धार्मिक-सांस्कृतिक साखळ दंड उद्ध्वस्त केले पाहिजे. कायद्यापुढील समानतेच्या सुत्रांची काटेकोर अंमलबजावणी करुन देशाच्या समृध्दतेला गती दिली गेली पाहिजे. सामाजिक समतेबरोबरच संधीची समानता निर्माण केली पाहिजे. केवळ गुणवत्ता असून चालत नाही, संधीची समानताही आणावी लागेल. असा आग्रह धरुन केवळ न...