कोरोनाचा विषाणू ...चिकन आणि गौरसमज दूर करण्याचा फंडा
कोरोना विषाणू बाबत भारतात , महाराष्ट्रात आणि जगभर आफवांचे पेव फुटले आहे ... चिकन खाल्यानं कोरोना विषाणूची बाधा होते या आफवेमुळे तर चिकनच्या आणि अंड्यांच्या विक्री आणि वापरावर परिणाम झाला ... अनेकांच्या अंडी आणि चिकन खाणं सोडले ... या अफवा आणि गैरसमज दूर करण्यासाठी लातूरमधील पोल्ट्री फार्मर्स अँड चिकन सेंटर असोसिएशनच्या वतीनं काल लातूर मध्ये ३ मार्च २०२० बार्शी रोडवरील गरड गार्डन येथे चिकन फेस्टिवलचे आयोजन केले होते ... लातूर जिल्ह्यात दररोज ३५ टन चिकनची विक्री होते ...तर या व्यवसायात २५ हजार व्यक्ती काम करतात ...हल्ली जिल्ह्यातील चिकन वक्री दररोज दहा टना पेक्षा खाली आली आहे ... या फेस्टिवल मध्ये ७५० किलो चिकन , ७५० किलो बिर्याणी आणि १५०० अंडी अशी व्यवस्था केली होती ..केवळ ५० रुपयांत एक प्लेट चिकन 65 , एक प्लेट बिर्याणी , एक बॉईल अँड देण्यात आलं होतं ... केवळ दोन तासात हे सगळं नागरिकांनी फस्त केलं ... गौसमज दूर करण्याचा हा फंडा खासच म्हणावा लागेल ...
Comments
Post a Comment