पहिला विधवा विवाह महात्मा फुले यांनी लावला ...
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान होतं .... सामाजिक परिवर्तनाच्या सर्वच क्षेत्रात अमिठ ठसा त्यांनी उमटवला ... अनेक आदर्श घालून दिले ...एकोणीसाव शतक म्हणजे देशातील अनेक घटना घडामोडीचा साक्षीदार असणारं शतक ... कर्मठ रूढी - परंपरा धरून ठेवण्याचा अठापीठा करणारे एकीकडं आणि या कालबाह्य रुढी - परंपरांना मूठमाती देऊन नव्या आधुनिक संकल्पनांवर आधारित नवा समाज घडवू पाहणारे सामाजिक क्रांतिकारक एकीकडे असेच चित्र दिसते ... प्रामुख्यानं महिलांच्या बाबतीत तर भयानक परंपरा होत्या त्यांची कल्पनाच न केलेली बरी असही म्हटलं जाईल ... बाल विवाह , विधवा विवाहास बंदी , केशवपन , मुलींना शिक्षण देण्यास बंदी आशा कितीतरी बंधनांचा फास तिच्या गळ्या भोवती होता ... अशा परिस्थिती जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यासारख्या परंपरावादी शहरात समाज परिवर्तनाची पताका उचलून धरली ... पहिला विधुर विवाह जोतीराव फुले यांच्या प्रयत्नांनी आणि पुठाकारान 5 मार्च 1855 रोजी पुण्यात परमहंस सभेच्या वतीने विधुर देशमुख आणि विधवा पाटलीण यांचा पुनर्विवाह लावण्यात आला . या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले होते ... बालपनी मुलींचे विवाह व्हायचे अन कमी वयात विधवा झालं की पुनर्विवाहाची परवानगी नसल्यानं डोक्यावरचे केस कापून विद्रुप करून अंधाऱ्या कोथंडीतल्या सारख जीवन जगण्यास भाग पडायचं ... त्यातही अशा विधवांवर अत्याचार करणारे असतच ...त्यातून ती विधवा गरोदर राहिली तर तिचा खून केला जाई किंवा गर्भपात करून तिचे हाल हाल केले जात ...अशा छळास कंटाळून किंवा घाबरून काही विधवा आत्महत्या करत असत ... अशीच नदीत उडी घेऊन वाहत्या पाण्याच्या मोठया प्रवाहात आत्महत्या करताना वाचवलेल्या काशीबाई या गरोदर विधवेस महात्मा फुले यांनी वाचवले ... आपल्या घरी आणून तिचा सांभाळ केला ... सावित्रीबाई यांनी तिचे लाड मुली सारखे केले ... तिच्या पोटातील गर्भाची आणि तिची खूप काळजी घेतली ... तिच्या पोटी झालेल्या बाळाला समाजाचा आणि नातेवाईकांचा तीव्र विरोध असताण रीतसर ( कायदेशीर प्रक्रिया करून ) दत्तक घेतले ... त्या बाळाचे नाव " यशवंत " ठवले ... त्यास उत्तम प्रतीचे शिक्षण देऊन एम बी बी एस डॉक्टर केले ... त्यासही सामाजिक कार्यात सक्रिय केले ...डॉ यशवंत यांचा विवाह राधा उर्फ लक्ष्मी हिच्याशी लावून दिला ...डॉ यशवंत फुले यांनीही खूप समाज सेवा केली ... महात्मा जोतीराव फुले यांच्या निधनानंतर आई सावित्रीबाई यांची खूप काळजी घेतली ... डॉ यशवंत फुले यांच्या पत्नी राधा उर्फ लक्ष्मी यांचे निधन 6 मार्च 1895 रोजी झाले ...
यशवंत भंडारे ,
लातूर ,
दि .6 मार्च 2020
लातूर ,
दि .6 मार्च 2020
Comments
Post a Comment