भाषा तज्ज्ञ, साहित्यिक, उत्तम प्रशासक तंजावरचे व्यंकोजी राजे भोसले ...!!!



व्यकोजीराजे भोसले यांनी दक्षिणेतील आत्ताच्या तमिळनाडूमध्ये तंजावर येथे 5 मार्च 16 76 रोजी राज्याभिषेक करून घेतला ... तेही छत्रपती झाले ... व्यंकोजी राजे हे शहाजीराजे भोसले यांचें पुत्र होते ... शहाजीराजे यांच्या पत्नी तुकाबाई यांचे व्यंकोजी पुत्र होते ... तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे धाकले सावत्र बंधू होते ...
व्यंकोजी राजे यांनी वडील शहाजीराजे भोसले यांच्या मृत्यूनंतर विजापूरकर आदिलशाही सुल्तानीतीतली त्यांची जहागीर आपल्या ताब्यात घेतली ... ते लेखक , नाटककार होते ... त्यांच्या नावावर 50 ग्रंथ ,12 नाटकं होती ... कुशल प्रशासक , संसंस्कृत भाषेबरोबरच तेलगू इतरही काही भाषा येत असत तर संस्कृत , तेलगू भाषेचे ते तज्ञ होते ... तसेच शूर , पराक्रमी आणि साहसी राजा म्हणूनही त्यांचा परिचय होता ... त्यांनी अनेक कलांचे संवर्धन तर केलेच तसेच संस्कृती भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले ...
व्यंकोजी राजे भोसले यांनी त्यांच्या स्वराज्यात शेती आणि अर्थव्यस्थेला उभारी देण्याचं काम केलं ... त्यासाठी अनेक सुधारणा राबवल्या ... शेतीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी त्यांनी नवे बांध बांधले , धरणं बांधली , कालव्याचे जाळे निर्माण करून शेती शाश्वत केली ... मदुराई आणि म्हैसूर राज्यापासून कायम आपले स्वराज्य सुरक्षित राहण्यासाठी त्यांना जरबेत ठेवले ... प्रसंगी दोन हात केले ... " कारनाकलनिधी " या तेलगू भाषेतील काव्य ग्रंथात शिवराम कवी यांनी व्यंकोजी राजे यांच्या द्रष्टेपणाबाबत कौतुक केलं आहे ...
प्रशासन उत्तमपणे चालावे म्हणून त्यांनी ज्यू आणि फ़्रेंच लोकांना आपल्या दरबारात नेमले होते ...आधुनिक विचारांची कासधरून त्यांनी राज्य केले ... व्यंकोजी राजे आणि त्यांच्या पत्नी हे स्वतः शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित होते ... व्यंकोजी राजे यांच्या पत्नीही साहित्यिक होत्या ... देशातील पहिला छापखाना व्यंकोजी राजे यांनी उभारणी केली होती ... 1684 मध्ये त्यांचे निधान झाले ...
यशवन्त भंडारे ,
लातूर ,
दि .5 मार्च 2020

Comments

Popular posts from this blog

बाबासाहेबांचा मराठवाड्याशी असलेला स्नेहबंध

संवेदनशील मनाचे गझल सम्राट सुरेश भट

प्रबुद्ध भारत हे नाव का स्वीकारले ?