सत्याग्रह माणसाच्या माणुसपणासाठी ...!!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 मार्च 1930 रोजी अस्पृश्य हिंदूंच्या सामाजिक आणि धार्मिक समतेसाठी नाशिक येथील पंचवतील काळाराम मंदिर सत्याग्रहाची घोषणा केली ...या दिवशी प्रथम नाशिक शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषद घेऊन हा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेण्यात आला... सायंकाळी सभा होऊन दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 3 मार्च 1930 पासून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू करण्यात आला ... पहिल्या गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब 4 ऑक्टोबर 1930 रोजी मुंबईतून " व्हाइसरॉय ऑफ इंडिया " बोटीने लंडनला रवाना झाले ... त्यामुळे त्यांच्या अनुउपस्थितीत हा सत्याग्रह भाऊराव गायकवाड आणि अमृतराव रानखांबे यांनी नेटाने 12 ऑक्टोबर 1935 पर्यत चालवला ... स्पृश्यांचे मतपरिवर्तन होत नाही हे पाहून हा सत्याग्रह बाबासाहेबांनी थांबवला करण ..." बाबासाहेबांनी केलेला हा सर्वात मोठा ऐतिहासिक सत्याग्रह देवाचा उदोउदो करण्यासाठी नव्हता तर माणसाला माणूस बनवण्यासाठी उचलेलं पाऊलं होतं ..."
Comments
Post a Comment