आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे

लोकसंभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्च 2019 पासून या निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी वेगाने सुरु आहे. या निवडणूक काळात नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत निवडणूक आयोगाने निश्चित केलेली कामे याबाबत माहिती देणारा हा लेख… निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील.ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग / राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण / मान्यता प्राप्त करण्यात यावे.पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनेतेसाठी सहाय्यकारी आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व त्यापूढे सुरु ठेवता येतील. पण त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी.मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रेाख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल.मैदानासा...